कामोठे 4K डिजिटल न्यूज चॅनल.जुही गार्डन को-ऑप. हौसिंग सोसायटीतर्फे आज सोसायटीच्या सुशोभीकरण तसेच दुकानांसमोरील लाद्या बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नारळ फोडून करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे सचिव सुरेश भोसले यांनी केले. यावेळी भाजप कामोठे शहर अध्यक्ष विकास घरत आणि नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार सोसायटीचे […]
(प्रेस विज्ञप्ती) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त L&T आणि रायन इंटरनॅशनल स्कूल प्लास्टिकविरहित भविष्यासाठी एकत्र आले
दिनांक: 5 जून 2025पनवेल, महाराष्ट्र – शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, लार्सन अँड टुब्रो (L&T) ने रायन इंटरनॅशनल स्कूलसोबत भागीदारी करून प्लास्टिक प्रदूषण व पर्यावरणपूरक पर्यायांवर केंद्रित एक सशक्त जनजागृती मोहीम आयोजित केली. ही मोहीम रायन इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात पार पडली आणि यामध्ये NAINA (नई मुंबई एयरपोर्ट इन्फ्लुएंस्ड नोटिफाइड एरिया) […]
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातुन अपहरण झालेल्या 3 महिन्यांच्या बाळाची पनवेल शहर पोलीस ठाण्याकडुन 24 तासात सुटका व आरोपीता ताब्यात
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन दिनांक 30/05/2025 रोजी 15.00 वा. ते 15.30 वा. च्या दरम्यान 3 महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले म्हणुन पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. 292/2025 BNS 137 (2) (IPC 363) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ […]
परिमंडळ 2 आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल व आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास 110 अधिकारी व कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. पीडीजे […]
*लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प*
*केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रम**पनवेल/प्रतिनिधी:* लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक 1 जून रोजी लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला स्वतः लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांच्यासह आ.प्रशांत ठाकूर,आ. महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, […]
*कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ(पनवेल) तर्फे रक्तदान शिबीर*
पनवेल दि.२८ (संजय कदम): कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ(पनवेल) तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजे पर्यंत पनवेल शहरातील ओरायन मॉल पनवेल येथे करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरासाठी एम जी एम कामोठे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे यासाठी संपर्क […]
*अनोळखी इसमाचा आढळला मृतदेह*
पनवेल दि.२८ (संजय कदम): पनवेल परिसतातील एक इसम उपजिल्हा रुग्णालयात मृत पावला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर अनोळखी बेवारस इसमाचे वय अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फुट, चेहरा उभट, अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे, दाढी मिशीचे केस काळे वाढलेले, अंगात नेसुन मळकट लाल रंगाचा […]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेलमध्ये साजरी
पनवेल दि.२८ (वार्ताहर): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेल परिसरात बुधवारी साजरी झाली. या निमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील सावरकर चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. अभिवादनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर […]
गांजा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी एका इसमाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिराच्या बाजूला चिरंजीत पहाडी (42 रा.कळंबोली) हा तळाहातावर हिरवट मळकट रंगाची पाने फुले असलेला गांजा हा अंमली पदार्थ त्याच्या हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने मळून मळालेला पाला मातीच्या चिलीममध्ये भरुन जळत्या काडीने पेटवत […]
परिमंडळ 2 आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल व आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.29 मे 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता पनवेल शहर पोलीस […]
