नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*

4kNews दि. 27
*नवी मुंबई :* वाढत्या ॲलर्जीच्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून न्यूईरा हॉस्पिटलने नवी मुंबईत अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू केले आहे. या क्लिनिकअंतर्गत रुग्णांसाठी एक विशेष ‘ॲलर्जी पॅकेज’तयार करण्यात आले असून,यातंर्गत एकाच पॅनेलमध्ये तब्बल १५० ॲलर्जन्सची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे कमी खर्चात अचूक निदान आणि प्रभावी उपचार व्यवस्थापन शक्य होणार आहे.



ॲलर्जीची लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते किंवा त्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात ज्यामुळे रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक अन्न, पर्यावरण आणि जीवनशैलीशी संबंधित विविध प्रकारच्या ॲलर्जींचे अचूक निदान करण्यास मदत करणार आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या ॲलर्जीचे मूळ कारण (ट्रिगर्स) ओळखता येईल आणि त्यानुसार वैयक्तिक उपचार योजना आखता येतील. 



*या क्लिनिकचे उद्घाटन  डॉ. अमिश वाखलू (ईएनटी आणि हेड ॲण्ड नेक सर्जन), डॉ. चंद्रशेखर टी. (क्रिटिकल केअर मेडिसिन), डॉ. निशांत तावडे (इंटरनल मेडिसिन) आणि डॉ. मनीष पेंडसे (फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुनील कुट्टी (संस्थापक संचालक – ब्रेन आणि स्पाइन सर्जरी) आणि डॉ. माताप्रसाद गुप्ता (उपाध्यक्ष आणि सीईओ) यांची प्रमुख उपस्थिती होती.*
*डॉ. अमिश वाखलू (ईएनटी आणि हेड ॲण्ड नेक सर्जन) सांगतात की,* अनेकदा ॲलर्जीकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे वारंवार लक्षणं जाणवू लागतात आणि अस्वस्थता निर्माण होते. या क्लिनिकमुळे अन्न, श्वसनमार्गासंबंधी ॲलर्जी (जसे की धूळ, परागकण आणि पाळीव प्राण्यांचे केस) आणि त्वचेशी संबंधित ॲलर्जींचे अचूक निदान करता येणार आहे. एकाच पॅनेलमध्ये विविध तपासण्या उपलब्ध असल्याने वेळ वाचेल आणि अचूक उपचार घेणे शक्य होईल. 



*डॉ. माताप्रसाद गुप्ता (उपाध्यक्ष आणि सीईओ) यांनी सांगितले की,* रुग्णांना अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. या ॲलर्जी क्लिनिकमुळे रुग्णांना वेळीच निदान, योग्य उपचार आणि उत्तम आरोग्य मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल.
न्यूईरा हॉस्पिटलचा हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, ॲलर्जीच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top