नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न

4kNews कामोठे
पनवेल दि. ०6 (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न करण्यात आला.  या महोत्सवाची सुरुवात पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीने अतिशय जल्लोषामध्ये व हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली .

 

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणुकीची सांगतात डॉ. पटवर्धन हॉस्पिटलच्या समोरील गुजराती शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न झाले.  या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध गायक रवी जाधव यांच्या ऑर्केस्ट्राने भीम गीतांचा अतिशय सुमधुर असा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व उपस्थित भीमसैनिकांना भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.  या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल तालुका व पनवेल शहर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने करण्यात आले होते.  

हा भीम जयंती महोत्सव संपन्न होण्याकरिता गावोगावी आमंत्रण पाठवून करण्यात आली होती.  या जयंतीचा संपूर्ण खर्च हा गावागावातील भीमसैनिकांनी दिलेल्या धम्म दानातून करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ज्येष्ठ नेते नरेंद्र गायकवाड पनवेल , विजय  गायकवाड पनवेल, महेश साळुंखे वडघर, सचिन कांबळे काळुंद्रे,  सचिन रमेश कांबळे शिवकर, प्रवीण खंडागळे पोयंजे, ज्येष्ठ बौद्धाचार्य हिरामण जोशी गुरुजी विचुंबे, राहुल गायकवाड काळुंद्रे,  नितीन कांबळे आदई यांनी गेले महिनाभर अतिशय परिश्रम घेतले होते. भीम जयंती महोत्सव अतिशय उत्साह पूर्ण आणि यशस्वीरित्या संपन्न केल्या बद्दल सर्व आयोजक कार्यकर्त्यांचे सर्व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top