4kNews दि. 15 कामोठे
पनवेल / नवी मुंबई प्रतिनिधी :
नवी मुंबई परिसरात पत्रकारिता आणि सामाजिक विषयांवर सातत्याने कार्य करणारे पत्रकार गौरव जहागिरदार सध्या गंभीर हृदयविकाराशी झुंज देत आहेत. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांच्या हृदयात ब्लोकेज आढळून आले असून तातडीने Angioplasty करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


कामोठे येथील सुप्रसिद्ध B & J Hospital मध्ये नुकतीच त्यांची Angiography करण्यात आली. त्यावेळी B & J Hospital चे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. श्री. बागुल यांनी त्यांना तातडीने Angioplasty करण्याचा सल्ला दिला.

सध्या गौरव जहागिरदार यांच्या प्रकृतीवर नगरसेवक डॉ. अरुण कुमार भगत आणि डॉ. हेमंत पाटील हे देखरेख करत आहेत.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून आगामी वैद्यकीय प्रक्रियेसाठी मोठा आर्थिक खर्च अपेक्षित आहे. मात्र अचानक आलेल्या या वैद्यकीय संकटामुळे त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गौरव जहागिरदार यांनी अनेक सामाजिक प्रश्न, स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या मुद्द्यांना आपल्या पत्रकारितेतून आवाज दिला आहे. आता मात्र स्वतःच्या उपचारासाठी त्यांना समाजाच्या मदतीची गरज भासत आहे.
त्यामुळे नागरिक, मित्रपरिवार, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. छोटीशी मदतही त्यांच्या उपचारासाठी मोठा आधार ठरू शकते.

उपचाराशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे आणि डॉक्टरांचे सल्ले उपलब्ध असून इच्छुकांनी मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क : गौरव जहागिरदार
मो. 9967447111
“आजवर समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकाराला आज समाजाच्या मदतीची गरज आहे.”

