छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”



4kNews कामोठे
14 मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व 6 जून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यातपर्यंत करंजाडे शहरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “स्वच्छ पर्यावरण, हरित पर्यावरण” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री.प्रथमेश  भास्कर पुंडे आणि सहकाऱ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. 


वृक्षारोपणानंतर प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारली. “आज लावलेले झाड हे उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरेल,”
“एक व्यक्ती – एक झाड” या संकल्पनेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पावसाचे बदलते प्रमाण यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे अनुषंगाने करंजाडेतील रहिवासी काम करत आहे. 


भविष्यात करंजाडे अधिक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सातत्याने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रेम यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top