नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

डीजीपींच्या निर्देशांनंतरही पॉक्सो गुन्ह्याच्या नोंदीला विलंब? १० वर्षीय मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी पालघर पोलिसांच्या कार्यवाहीवर तक्रारदारांचा आरोप

4kNews कामोठे दि. 22

मुंबई (प्रतिनिधी) – अजित मोहिते : १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीप्रकरणी पोलीस महासंचालक कार्यालयाने पालघरच्या पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिल्यानंतरही एफआयआर दाखल झालेला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून निर्देश मिळूनही स्थानिक पोलिसांकडून कार्यवाहीला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.



तक्रारदारांनी १४ ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या १० वर्षीय मुलीने ४ ऑगस्ट रोजी कथित अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पालघर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच आपत्कालीन ११२ क्रमांकावर संपर्क साधला. या संपर्काची CFS38537073 या संदर्भ क्रमांकाने नोंद झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मुलीची पालघर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



तक्रारदारांच्या आरोपानुसार, तक्रार नोंदविण्यासाठी पालघर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. तसेच अल्पवयीन मुलीशी धमकीच्या स्वरूपात वर्तन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी १९ ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालकांची प्रत्यक्ष भेट घेण्याची विनंती केली होती.

डीजीपी कार्यालयाकडून एसपी कार्यालयाला निर्देश
तक्रारीनंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने संबंधित ई-मेल पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविला. त्यामध्ये ‘necessary action and inform the complainant/sender accordingly’ असे निर्देश देण्यात आल्याचे तक्रारदारांनी सांगितले. पुढील पाठपुराव्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही त्यांना कळविण्यात आले.  मात्र, या निर्देशांनंतरही कथित अत्याचाराच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्याची किंवा पुढील कार्यवाहीची माहिती आपल्याला देण्यात आलेली नाही, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे डीजीपी कार्यालयाच्या निर्देशांनंतरही कार्यवाहीला विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



“न्यायासाठी आणखी कोणाकडे जावे?”
“अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केले आहेत. ११२ क्रमांकावर संपर्क करण्यात आला असून वैद्यकीय तपासणीही झाली आहे. डीजीपी कार्यालयानेही आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. तरीही गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असेल, तर न्यायासाठी आणखी कोणाकडे जावे?” असा सवाल तक्रारदार कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. 



दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासून कायद्यानुसार निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने तक्रारीची संवेदनशीलतेने दखल घेऊन कायदेशीर प्रक्रियेनुसार तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. डीजीपी कार्यालयाच्या निर्देशांनंतर पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top