4kNews दि. 4 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉस १९ सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे. स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात विशेष ठसा उमटवला आहे. देशभरात […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्षनिमित्त आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा
4kNews दि. 4
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्षनिमित्त चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) अर्थात सीकेटी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत व चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य […]
चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्ती कामाला तातडीने सुरुवात
आमदार ठाकूर यांचा प्रयत्न यशस्वी
4kNews दि. 4पनवेल (प्रतिनिधी) सिडकोच्या नैना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चिपळे पूल ते नेरे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आजपासून सुरु झाले आहे. हा रस्ता दररोजची वर्दळ असलेला असून, यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या भागांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या कामाला सुरुवात झाली असून प्रवासी नागरिक वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर […]
विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ३५ लाख रुपयांची देणगी
4kNews दि. 4 सिन्नर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन शैक्षणिक संस्थांसाठी एकूण ३५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांनी ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ […]
शुक्रवारपासून पनवेलमध्ये १२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी
4k News दि. 4 पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या १२ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक ०५, ०६ आणि ०७ […]
“कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या ‘दत्तात्रय वस्तीगृह’चा भव्य शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या समस्यांना दिला दिलासा”
4k समाचार आज मंगळवार दिनांक 3/१२/२०२५ रोजी कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते करण्यात आले . या वस्तीगृह मध्ये बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालय, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व बबन दादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या […]
मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील रविवार येणार खांदावसाहतीमध्ये
4k समाचार पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पनवेल च्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत. सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उदघाटन व मराठा कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमानिमित्त मराठा संघर्षयोद्धा […]
पनवेल स्टेशन परिसरात डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली फॉर्च्युनर कार जप्त; पिस्तूलसदृश शस्त्रासह चालक अटक
4k समाचार पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : पनवेल वाहतूक शाखेच्या दक्ष कारवाईत नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली संशयित फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली असून, कारमध्ये पिस्तूलसदृश शस्त्र सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चालकास अटक करून पुढील तपास खांदेश्वर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस […]
*खारघर येथे पार पडलेल्या डेव्हिल्स सर्किट २०२५ ला मेडिकव्हर हॉस्पिटल्सकडून चोवीस तास वैद्यकिय मदत*
4k समाचार *नवी मुंबई* : भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आव्हानात्मक अशा शर्यत स्पर्धांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट २०२५ साठी मेडिकव्हर हॉस्पिटल्सने वैद्यकिय मदतीकरिता हात पुढे सरसावला. खारघर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ४,५६७ धावपटू आणि १,६७८ प्रेक्षक सहभागी झाले होते. वैद्यकीय सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने याठिकाणी पूर्णपणे सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा […]
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
पनवेल, दि.3 (संजय कदम) ः मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून 6 महिलांची गुन्हे शाखा पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे […]
