4k समाचार पनवेल दि. 27(वार्ताहर): कामोठे सेक्टर ३४ व ३५ परिसरात मालवण तडका आणि नीलकंठ हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज गंभीर स्वरूपाची वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याची रुंदी कमी असतानाही दोन्ही बाजूंना अनियमितपणे वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत शिवसेना उप शहर प्रमुख कामोठे सचिन त्रिमुखे यांनी वाढत्या वाहतूक कोंडी व […]
नवी मुंबई पोलिसांच्या परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान
4k समाचार पनवेल दि. 27 ( वार्ताहर ) :नवी मुंबई पोलिसांच्या सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आयुक्तालयाने मोठी झेप घेतली आहे. आयोजित गुन्हे आढावा बैठकीदरम्यान आयुक्त मिलिंद भारंबे यांनी परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले. या मानांकनामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या पोलीस सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष […]
पनवेल महापालिका निवडणूक : प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ द्यावी — काँग्रेसचा आयुक्तांना मागणीपत्र
4k समाचार दि. 27 पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत कमी असल्याने तत्काळ मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी व हरकती जाहीर झाल्या असून हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. […]
पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती देवकीबाई कातकरी यांचे निधन. लोकनेते रामशेठ ठाकूर व ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांची श्रद्धांजली
4k समाचार दि. 26 पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती देवकीबाई कातकरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी कोंबडभुजे येथे भेट देत दिवंगत देवकीबाईंना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शैलेष भगत, निलेश खारकर, वितेश म्हात्रे, श्री. पिल्ले, बाळाराम पाटील, पंढरीनाथ भगत, देवराम भगत, […]
पनवेल बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक जाहीर
4k समाचार दि. 26 पनवेल (प्रतिनिधी) न्यायालयीन कामकाजात वकील, अशील, कर्मचारी आणि न्यायालयात उद्भवणारे प्रश्न तसेच समस्या सोडवण्यासाठी काम करीत असलेली पनवेल वकील संघटना म्हणजेच पनवेल बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या “जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८’’ या कालावधीसाठी त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शनिवारी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पनवेल दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीमधील वकील (बाररूम) […]
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी राहुल सोनावळे यांची नियुक्ती
4k समाचार दि. 26 पनवेल / निलेश सोनावणेअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सचिव तथा रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकरी यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन केली असून या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी […]
संविधान दिन उत्साहात साजरा
4k समाचार पनवेल दि. २६ (प्रतिनिधी) – भारताच्या संविधान स्वीकृती दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी मंडलाध्यक्ष भूपेंद्र पाटील, अनेश ढवळे, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने होऊन भारतरत्न डॉ. […]
वंचित बहुजन आघाडीची मुंबईत संविधान महासभा
4k समाचार दि. 25 मुंबई दि. २५ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर “संविधान सम्मान महासभा” चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महासभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी […]
भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने
4k समाचार दि. 25 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा करंजाडे येथे आल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल आणि करंजाडेदरम्यान गाढी नदीवर बांधण्यात येणार्या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचे तसेच सिडकोच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या निधीतून करंजाडे सेक्टर 1 ते […]
शेकाप, शिवसेनेला जोरदार धक्का
4 k सामाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेल तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शेकापचे गुळसुंदे विभाग माजी जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविशेठ चोरघे, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक ठोंबरे, शिवसेना ‘उबाठा’चे सांगुर्ली शाखाप्रमुख नितेश पारधी आणि युवासेना अधिकारी […]
