4k समाचार दि 23 पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात […]
वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार
4k समाचार 23 नवी मुंबई – पनवेल येथे १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी ६३ वर्षीय भारती धरणीधर दवे यांना लुटल्याची घटना घडली. साईनगर रोडवरून घराकडे पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, आरोपींचा […]
अनधिकृत शाळांविरुद्ध पालिकेची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल
4k समाचार दि. 23 नवी मुंबई – पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केलेल्या तपासणीत शहरात अनेक शाळा परवानगीशिवाय सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयुक्तांच्या सूचनेनुसार संबंधित शाळांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल, अर्कम इंग्लिश स्कूल, ओसीन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल […]
वृद्धाची फसवणूक करून २.५० लाखांची सोन्याची चैन लंपास
4k समाचार दि. 23 नवी मुंबई – पनवेल बस स्थानक परिसरात ६५ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून त्याच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची, अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रशेखर सावंत यांनी कळंबोलीला जाण्यासाठी भाड्याने इको गाडी ठरवली होती. दरम्यान, गाडीचालकाने सावंत यांना चहातून गुंगीचे औषध देऊन त्यांची […]
संन्यस्त खड्ग’ नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा इशारा; पनवेलमध्ये प्रयोग थांबवण्याची मागणी
4k समाचार दि. 23 पनवेल/रायगड (प्रतिनिधी) – वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगाविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा प्रयोग होणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करीत या नाटकाला विरोध दर्शविण्यात आला आहे. […]
श्रमणसंघ जिवंत राहिला, तरच तो सदैव सशक्त राहील – युवाचार्य महेंद्र ऋषिजी
4k समाचार पनवेलमध्ये महाराष्ट्रातील ९० श्रीसंघांचा ऐतिहासिक व भव्य संमेलनपनवेल दि. 23 ( वार्ताहर ) : सप्टेंबर।श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, मुंबई–पुणे प्रांत, पंचम झोन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल व मेवाड़ श्रावक संघ यांच्या संयुक्त तत्वावधानात पनवेल येथील बँक्विट हॉलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील श्रीसंघांचे भव्य मिलन संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलन […]
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन
4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) – शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहरातील डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, […]
सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे गुरुवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण
4k समाचार दि. 23पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजता पनवेल येथील आद्य […]
गुळसुंदे येथे अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवाची उत्साहात सुरुवात
पनवेल (प्रतिनिधी) – गुळसुंदे येथील अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्रौत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. सोमवारी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंगलमय वातावरणात देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रद्धाळू भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित […]
तनाएराचे नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’; खास ऑफर्स व खरेदी योजना ग्राहकांसाठी उपलब्ध
4k समाचार दि. 23 तनाएराचे नवेफेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’विशेष ऑफर्सआणि अनोखी खरेदीयोजना ग्राहकांना मिळवूनदेणार स्वप्नपूर्तीचा आनंद नवी मुंबई/ पनवेल (प्रतिनिधी) महिलांचा एथनिक वेयर ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, तनाएराने प्रस्तुत केले आहे नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ हाताने विणलेले आणि शुद्धतेमध्ये रुजलेले हे कलेक्शन आधुनिक महिलांसाठी तयार केले आहे. आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कला यांच्या अप्रतिम विणीतून एक आगळीवेगळी […]
