नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

कळंबोली–कामोठे वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजनांची मागणी ; शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक निकम यांचे वाहतूक विभागाला निवेदन; बेकायदेशीर पार्किंग, बंद सिग्नल आणि अवजड वाहनांवर कारवाईची मागणी

4kNews  कामोठे
पनवेल, दि. 28 (वार्ताहर) : कळंबोली, कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख दीपक रामचंद्र निकम यांनी कळंबोली वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


निवेदनानुसार, कळंबोली, कामोठे व खांदा कॉलनी परिसरात वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अंतर्गत रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्ते अरुंद होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे सकाळी आणि सुट्टीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल दीर्घकाळापासून बंद असून वाहतूक पोलिसांची उपस्थिती अपुरी असल्याने समस्या अधिक गंभीर बनल्याचे निकम यांनी म्हटले आहे.
याशिवाय कळंबोली स्टील मार्केट परिसर, रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कलदरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड ट्रक व ट्रेलर उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. अवजड वाहनांच्या प्रवेशबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


निवेदनाद्वारे अंतर्गत रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात विशेष मोहीम, शाळा व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती, बंद वाहतूक सिग्नल तातडीने सुरू करणे, अवजड वाहनांवर कठोर कारवाई आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दीपक निकम यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top