नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीस अभिजित जाधव व सत्यवान नाईक यांच्याकडून ५१ हजारांचा धनादेश

4kNews कामोठे दि. 6
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीस अभिजित जाधव व सत्यवान नाईक यांच्याकडून ५१ हजारांचा धनादेश
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर, होर्डिंग, पुष्पगुच्छ, केक तसेच इतर अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी योगदान देण्याचे केलेले आवाहन नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून उत्स्फूर्तपणे स्वीकारले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री. अभिजित जाधव व श्री. सत्यवान नाईक यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.



वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तो गरजू आणि समाजाच्या हितासाठी उपयोगात आणणे हीच वाढदिवसाची खरी भेट असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो तसेच सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते, असेही यावेळी सांगण्यात आले. वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम तसेच गरजू नागरिकांना मदत अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहनही करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या आवाहनाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी अनेक कार्यकर्ते, नागरिक आणि हितचिंतक पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top