नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम

4kNews कामोठे दि. 6

पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जी. के. गुजर चॅरिटेबल ट्रस्ट आणि के. एन. गुजर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, शालेय साहित्य वितरण तसेच जिजाऊ वस्तीगृहात अन्नदान असे विविध उपक्रम राबविण्यात आले.



आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी असल्याने त्यानिमित्त जी. के. गुजर चॅरिटेबल ट्रस्टचे व्हाईस चेअरमन इंद्रजीत गुजर आणि विरेंद्र गुजर यांच्या पुढाकारातून या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिनिधी म्हणून स्वीय सहाय्यक तथा पनवेल नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार यांनी उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी इंद्रजीत गुजर, विरेंद्र गुजर, हनुमंत कुंभार, ट्रस्टच्या सचिव माधुरी गुजर, प्राचार्य अन्वर मुल्ला, विशाल पाटील, गजानन भिसे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



शिबिरात नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. नेत्रतपासणीनंतर गरजू लाभार्थींना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा आणि सामाजिक मदत पोहोचविण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. ‘निरोगी समाज हीच खरी संपत्ती’ या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत २८० रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर ५०४ गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण आणि जिजाऊ वस्तीगृहात अन्नदान करून वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top