नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’चे आयोजन; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत निसर्गरम्य ट्रेकिंगचा अनुभव घेण्याची संधी

4kNews कामोठे दि 19

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’ या विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. हा ट्रेक शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत ट्रेकिंगचा अनुभव सहभागी नागरिकांना घेता येणार आहे.



या ट्रेकचा प्रारंभ धोधानी बस स्टॉप येथील श्री राम मंदिर येथून होणार आहे. धोधानी ते माथेरान या निसर्गरम्य मार्गावरून होणाऱ्या या ट्रेकच्या माध्यमातून निसर्गाशी जवळीक साधण्याबरोबरच युवकांमध्ये फिटनेस, साहस, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाई आणि परिसरातील मनमोहक वातावरणाचा आनंद घेत मित्र-परिवारासह ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव घेण्याची ही संधी आहे. ‘निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाचे संवर्धन करा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. या ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी 

https://forms.gle/dRwY29iDobV4NiDX8 या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी. या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमात नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top