नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

आरटीओतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवेदन; आंदोलनास परवानगी नाकारल्याने अधिकाऱ्यांची भेट


4kNews कामोठे दि. 19
पनवेल/खारघर (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसी संदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. 



मात्र आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, नागरिकांना होणारा त्रास थांबवावा तसेच गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 



परिवहन अधिकाऱ्यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित बाबींची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या हितासाठी तसेच परिवहन विभागातील पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चाँद शेख, श्रेयश भावसार, शोएब पटेल, आमिर राऊत यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top