नवीन बातम्या
सुवर्णकन्या सई कारंडेचा खारघर शिवसेनेतर्फे नागरी सत्कार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
बेलपाडा प्रकरणाची महसूलमंत्र्यांकडून दखल!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बैठक; मृताच्या कुटुंबाला मदत, वारसाला नोकरी व २४ घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्देश
विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी-व्यवसायासाठी २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय
अदानी समूहाचे आश्वासन; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत चार लाखांची मोटारसायकल जप्त; कळंबोलीतील दुसऱ्या चोरीचाही उलगडा
पनवेलमध्ये ‘स्वर्णमेघ ज्वेलर्स’चे उत्साहात उद्घाटन
नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा
मोहल्ला परिसरातील बेशिस्त पार्किंगविरोधात वाहतूक शाखेची कारवाई!
रस्ते अडविणाऱ्या वाहनचालकांना सूचना; बेवारस वाहने आणि हातगाड्यांचाही प्रश्न मार्गी लावणार
नवीन पनवेलमधील उद्यानांची दुरवस्था
उपमथळा  प्रभाग १७ मधील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या

विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी-व्यवसायासाठी २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय
अदानी समूहाचे आश्वासन; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती

4kNews कामोठे दि. 31

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या २१ गावांतील भूमिपुत्रांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधींमध्ये प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकनेते दि. बा. पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था, शिवभूमी रायगड अंतर्गत २१ गाव समितीचे पदाधिकारी, अदानी समूहाचे प्रतिनिधी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला सुमारे ८०० प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.



बैठकीत २१ गाव समितीचे कार्याध्यक्ष तथा ऑल इंडिया एडिशन एअरपोर्टचे सरचिटणीस सचिन केणी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या रोजगार आणि व्यवसायाशी संबंधित समस्या मांडल्या. मागील तीन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधित्वाबाबत संभ्रम निर्माण झाला असून, अनेक भूमिपुत्र रोजगार व व्यवसायाच्या संधींपासून वंचित राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.



यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी अदानी समूहाच्या प्रतिनिधींना २१ गाव समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. त्यावर अदानी समूहाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी आगामी भरती प्रक्रियेत २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय ठेवण्यात येईल, तसेच व्यवसायाच्या संधींमध्येही स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.



या आश्वासनामुळे प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा वाढल्या असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशा प्रकारे होते, याकडे आता भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, बाजीराव चव्हाण, विनोद साबळे, कवी तरेकर, अमर म्हात्रे, रुपेश मोहिते, सुनील कटेकर, श्रीधर पाटील, राहुल कोळी, मोहन घरत, संतोष म्हात्रे, विशाल भोईर, गौरी केणी, निशा केणी, पौर्णिमा परदेशी, ज्योत्स्ना केणी, स्वाती केणी, प्राजक्ता गोवारी, अमृत भोईर, सुहास पाटील, विवेक मोकल, महेंद्र नाईक यांच्यासह २१ गाव समितीचे पदाधिकारी व सुमारे ८०० प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top