नवीन बातम्या
सुवर्णकन्या सई कारंडेचा खारघर शिवसेनेतर्फे नागरी सत्कार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
बेलपाडा प्रकरणाची महसूलमंत्र्यांकडून दखल!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बैठक; मृताच्या कुटुंबाला मदत, वारसाला नोकरी व २४ घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्देश
विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी-व्यवसायासाठी २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय
अदानी समूहाचे आश्वासन; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत चार लाखांची मोटारसायकल जप्त; कळंबोलीतील दुसऱ्या चोरीचाही उलगडा
पनवेलमध्ये ‘स्वर्णमेघ ज्वेलर्स’चे उत्साहात उद्घाटन
नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा
मोहल्ला परिसरातील बेशिस्त पार्किंगविरोधात वाहतूक शाखेची कारवाई!
रस्ते अडविणाऱ्या वाहनचालकांना सूचना; बेवारस वाहने आणि हातगाड्यांचाही प्रश्न मार्गी लावणार
नवीन पनवेलमधील उद्यानांची दुरवस्था
उपमथळा  प्रभाग १७ मधील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या

बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत चार लाखांची मोटारसायकल जप्त; कळंबोलीतील दुसऱ्या चोरीचाही उलगडा

4kNews कामोठे

पनवेल, दि. 31 (वार्ताहर) : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे चार लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी नाशिक येथील अमोल शिरसाठ याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची बीएमडब्ल्यू मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, तपासात कळंबोली परिसरातील आणखी एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचाही उलगडा झाला आहे.



२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास करंजाडे येथील आर-०४ परिसरातील प्लॉट क्रमांक २०८ येथे पार्क केलेली बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर स्पोर्ट्स मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत व पथक आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, पळस्पे महामार्ग वाहतूक पोलीस केंद्रातील पोलीस हवालदार सचिन हांडे यांनी संशयावरून दुचाकीवरील दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक जण पळून गेला, तर अमोल शिरसाठ याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ती जप्त करण्यात आली.



पुढील तपासात कळंबोली पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील ९० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेडएस मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली. तसेच, अमोल शिरसाठ हा नाशिक रोड पोलीस ठाण्यातील अन्य एका गंभीर गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित राकेश गोकुळ राठोड (वय २४, रा. पंचवटी, नाशिक) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top