नवीन बातम्या
पनवेलमध्ये आधुनिक क्रिकेट मैदानासाठी १.२६ कोटींचा प्रस्ताव! क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्यासाठी नगरसेवक सुमित झुंजारराव यांचा पुढाकार; सात ते आठ संघांना सरावाची सुविधा मिळणार
प्रा. चंद्रकांत मढवी आणि गणेश कोळी यांना रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल एसटी स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची वणवण!
फेरीवाल्यांवर कारवाई, बड्या व्यावसायिकांना अभय का? लीना गरड यांचा महासभेत संतप्त सवाल
वडिलांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, तर मुलाने युरोपमध्ये मिळवली मास्टर डिग्री; अहिरे कुटुंबाचा दुहेरी गौरव
सुवर्णकन्या सई कारंडेचा खारघर शिवसेनेतर्फे नागरी सत्कार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
बेलपाडा प्रकरणाची महसूलमंत्र्यांकडून दखल!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बैठक; मृताच्या कुटुंबाला मदत, वारसाला नोकरी व २४ घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्देश
विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी-व्यवसायासाठी २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय
अदानी समूहाचे आश्वासन; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत चार लाखांची मोटारसायकल जप्त; कळंबोलीतील दुसऱ्या चोरीचाही उलगडा

बेलपाडा प्रकरणाची महसूलमंत्र्यांकडून दखल!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बैठक; मृताच्या कुटुंबाला मदत, वारसाला नोकरी व २४ घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्देश

4kNews कामोठे
पनवेल, दि. 31 (बातमीदार) : खारघर येथील बेलपाडा परिसरात २७ ऑक्टोबर रोजी सिडकोच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका आदिवासी बांधवाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली आहे. आमदार विक्रांत पाटील यांनी याप्रकरणी केलेल्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात तातडीची बैठक घेण्यात आली. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत, वारसाला नोकरी आणि बेलपाड्यातील २४ घरांच्या पुनर्वसनासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 



बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी संबंधित आदिवासी कुटुंबे सिडकोच्या स्थापनेपूर्वीपासून या परिसरात वास्तव्यास असल्याचा मुद्दा उपस्थित केला. जमीन संपादनावेळी पुनर्वसन किंवा भरपाई का देण्यात आली नाही, तसेच कारवाईपूर्वी आठवडाभर आधी नोटीस का देण्यात आली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सिडकोच्या काही अधिकाऱ्यांकडून बिल्डरांच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि वारसाला सिडकोमध्ये नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली.



महसूलमंत्री बावनकुळे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व वारसाला नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सरकारी जागांवरील अनधिकृत बांधकामे आणि रहिवाशांची यादी तयार करण्यास सांगितले.
चौकट : बेलपाड्यातील २४ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
बेलपाड्यातील संबंधित २४ घरांची यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या कुटुंबांना ‘सर्वांसाठी हक्काची घरे’ योजनेअंतर्गत प्रत्येकी एक हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला अडीच लाख रुपये देण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



चौकट : सरकारी जागा व नैसर्गिक नाल्यांची तपासणी
सरकारी जागांवरील २०११ पूर्वीच्या बांधकामांची नियमानुसार तपासणी करून यादी तयार करण्यास सांगण्यात आले. तसेच सिडकोला हस्तांतरित केलेल्या जमिनींवरील नैसर्गिक नाले, नद्या आणि सार्वजनिक सुविधांमध्ये बदल किंवा अतिक्रमण झाले आहे का, याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यकतेनुसार विशेष तपास पथक नेमण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.



घटनास्थळाची जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, संबंधित अधिकारी, उपसचिव जायभाय यांच्यासह शत्रुघ्न काकडे, समीर कदम, अजिंक्य ऊर्फ कीर्ती नवघरे, विजय पाटील, अभिमन्यू पाटील, संजय घरत, किरण पाटील, राजेश काकडे, आकाश पाटील, नितेश पाटील आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



आमदार विक्रांत पाटील यांची प्रतिक्रिया :
“सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या दिशाभूल करणाऱ्या कारवाईमुळे खारघर येथील आदिवासी वाडीतील एका निरपराध दिव्यांग बांधवाचा जीव गेला आहे. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, आदिवासी बांधवांचे खारघरमध्ये योग्य पुनर्वसन करावे आणि बिल्डरधार्जिण्या सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत केली. याबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top