नवीन बातम्या
सुवर्णकन्या सई कारंडेचा खारघर शिवसेनेतर्फे नागरी सत्कार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
बेलपाडा प्रकरणाची महसूलमंत्र्यांकडून दखल!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बैठक; मृताच्या कुटुंबाला मदत, वारसाला नोकरी व २४ घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्देश
विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी-व्यवसायासाठी २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय
अदानी समूहाचे आश्वासन; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत चार लाखांची मोटारसायकल जप्त; कळंबोलीतील दुसऱ्या चोरीचाही उलगडा
पनवेलमध्ये ‘स्वर्णमेघ ज्वेलर्स’चे उत्साहात उद्घाटन
नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा
मोहल्ला परिसरातील बेशिस्त पार्किंगविरोधात वाहतूक शाखेची कारवाई!
रस्ते अडविणाऱ्या वाहनचालकांना सूचना; बेवारस वाहने आणि हातगाड्यांचाही प्रश्न मार्गी लावणार
नवीन पनवेलमधील उद्यानांची दुरवस्था
उपमथळा  प्रभाग १७ मधील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या

नवीन पनवेलमधील उद्यानांची दुरवस्था
उपमथळा  प्रभाग १७ मधील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन

4kNews कामोठे

पनवेल, दि.31 (वार्ताहर) : नवीन पनवेलमधील प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत येणाऱ्या उद्याने आणि ग्रीन बेल्ट परिसरांची दुरवस्था झाली आहे. उद्यानांमध्ये कचरा, प्लास्टिक पिशव्या, दारूच्या व पाण्याच्या बाटल्या साचल्या असून, नियमित स्वच्छता आणि देखभालीअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणी न मिळाल्याने शोभेची झाडे सुकू लागली आहेत. या समस्येकडे लक्ष वेधत नगरसेवक अॅड. मनोज सिंधू कृष्णाजी भुजबळ यांनी महापौरांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



उद्यानांमध्ये झाडेझुडपे आणि गवत वाढल्याने अस्वच्छता निर्माण झाली असून, साप व विंचू लपून बसण्याची शक्यता आहे. येथे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले नियमित येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच उद्यानांच्या देखभालीसाठी नियुक्त कामगार अन्य कामांसाठी वळविण्यात आल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.



प्रभागातील सर्व उद्यानांची नियमित स्वच्छता करावी, वाढलेली झुडपे हटवावीत, कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि झाडांना नियमित पाणी देण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी अॅड. भुजबळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top