पनवेल, दि.12 (वार्ताहर) 4kNewsः तालुक्यातील टेंभोडे येथे राहणार्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच वर्चस्व युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, जनहित सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा व शिव स्वराज्य संस्था रायगडच्या महिला संपर्कप्रमुख निलीमाताई संदीप पाटील यांना नुकत्याच पार पडलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे स्वारगेट येथे मोठ्या दिमाखात सोहळा पार पडला. यावेळी त्यांना आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सन्मान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला बाळराजे वाळुंजकर, ॠतुजा पाटील, अन्वि अनिल घाडगे, जान्हवी राजे पाटील, वित्रा दिक्षित, अनिता चेतन घाडगे, अॅड.निता शेळके आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. आतापर्यंत निलीमाताई पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना विशेष सन्मानरत्न पुरस्काराने मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेवून पुरस्कार सन्मानित करण्यात आले
