पनवेल, दि.1 4k समाचार संजय कदम (वार्ताहर) ः एका 15 वर्षीय मुलीचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केल्याची घटना उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबतचा गुन्हा उलवे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सिमरन बाबुलाल मिन्झ (15) वर्षे असे या मुलीचे नाव असून उंची सुमारे 4.8 फुट, अंगाने सडपातळ, रंगाने सावळी, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस बॉयकट, अंगात पिवळ्या रंगाची कुर्ती व पॅन्ट, कानात दोन ठिकाणी टोचलेले त्यात लहान कानातली रिंग, तिला हिंदी भाषा अवगत आहे. सोबत मोबाईल फोन आहे.

सदर मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवे पोलीस ठाणे 8655354121 किंवा पोउपनि अनिल राजूरे 8600008869 यांच्याशी संपर्क साधावा.
