4k समाचार
नवी मुंबई दि. २६ (प्रतिनिधी) :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश केला आहे.

भोसले यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गट आणखी बळकट झाला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित मंगळागौर कार्यक्रमात त्या औपचारिकरित्या शिवसेनेत दाखल झाल्या. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

भोसले यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाला स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी नवा उत्साह मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
