नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

खारघर मधील अधिराज टॉवरच्या ५१ व्य मजल्यावर लागली भीषण आग

4k समाचार
पनवेल दि.०६(वार्ताहर): खारघर, सेक्टर ३६ येथील ५५ मजली ‘अधिराज कॅपिटल सिटी’ टॉवरमध्ये रात्री ५१ व्या मजल्यावरील एका बंद अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ आपत्कालीन मार्गाचा वापर करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. मात्र, पनवेल परिसरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील आगीचे हे सत्र सुरूच असल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. 


      रात्री ११.२४ वाजता खारघर अग्निशमन दलाला अधिराज टॉवरमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता जास्त असल्याने काळंबोली अग्निशमन दलाच्या पथकालाही तातडीने मदतीसाठी पाचारण करण्यात आले. पनवेलचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बंद असलेल्या ५१ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.” 

टॉवरची उंची जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या एका पथकाने पायऱ्या चढून थेट ५१व्या मजल्यावर प्रवेश केला, तर दुसऱ्या पथकाने लिफ्टचा वापर ४८ व्या मजल्यापर्यंत करून, त्यानंतर पायऱ्या चढून ५१व्या मजल्यावर आग विझवण्याची मोहीम सुरू केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तीन तास केलेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत ५१ व्या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top