नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये ‘राज्य निवडणूक समन्वयक’ म्हणून विशेष जबाबदारी


पनवेल दि.१५ (वार्ताहर) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी  भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना निवडणूक ‘राज्य निवडणूक समन्वयक’ ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. 


प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व राज्य निवडणूक प्रभारी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती घोषित करत अनेक नेते व पदाधिकारी यांना निवडणुकी संदर्भातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यापूर्वी आमदार विक्रांत पाटील यांनी अशा अनेक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आणि निवडणुकीसंदर्भातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने या आगामी निवडणुकांमध्येही त्यांना ही महत्त्वपूर्ण ‘राज्य निवडणूक समन्वयक’ ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांचे एक विशेष महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही नियोजनबद्ध पद्धतीनेच लढत असते. आता आगामी निवडणुकांमध्ये विजय संपादित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. या राज्यस्तरीय निवडणूक संचालन समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव तथा विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांची नियुक्ती घोषित होतात शेकडो कार्यकर्ते व हितचिंतक यांनी शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले आहे आणि आ.विक्रांत पाटील हे त्यांच्या संघटन कौशल्य व मेहनतीने या महत्वपूर्ण जबाबदारीला उचित न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top