उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा, या विद्यालयातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग नव्याने विदयालयाचा कार्यभार स्विकारणाऱ्या संस्थेने लागू केलेला नाही. परंतु सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे चालू असलेल्या वेतनामध्ये जुलै – २०१९ पासून वार्षिक वेतनवाढ आणि त्या अनुषंघाने राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता गेली सात वर्षे न […]
ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांवर ड्रायव्हरसोबत क्लीनर (अटेंडंट) ची नेमणूक करण्याची मागणी.
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुका अपघात निवारण समिती (नि)ने आजपर्यंत अनेक समस्यावर आवाज उठविला आहे.रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आदींवर नियंत्रण, अद्ययावत रूग्णालय, अपघातग्रस्तांना मदत, पार्किंग झोन, मास्टर प्लॅन, पायाभूत सुविधा इ. मागण्यांसाठी तालुक्याची शिखर संघटना म्हणून उरण तालुका अपघात निवारण समिती उरण तालुक्यात कार्यरत आहे उरण मधील वाढते अपघाताचे प्रमाण, मृत्यूची वाढती […]
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्याततील प्रत्येक समाजाचा सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र लिंगायत समाजावर अन्याय करत महामंडळाचा लाभ घेण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विकास महामंडळ अंतर्गत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) म्हणून स्थापन करण्यात आली […]
वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील सोसायटीत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला
दि.18 4k News वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील शुभ हर्ष सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर .. च्या माध्यमातून आपण कामोठे कराना आव्हान केले होते तर कामोठेतील जनता ही एक नवीन बदल पाहू इच्छित आहे […]
शेकापचे उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार यांचे व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या रहिवाश्यांनी मानले आभार.
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )२०१२ साली ३४ ग्राहकांनी उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मध्ये साईनाथ डेव्हलोपर्स या बिल्डर कडे घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केली होती.तब्ब्ल ३ कोटिहून अधिक रक्कम भरून ग्राहकांनी येथे रूम बुकिंग केले होते. पैसे सुद्धा ग्राहकांनी बिल्डरला अदा केले होते.परंतु साईनाथ डेव्हलोपर्स यांनी सर्वांची फसवणूक करत फरार झाला होता.त्यावेळी सर्व ग्राहक अडचणीत आले […]
चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया कोळी यांची बिनविरोध निवड
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या उपसरपंचपदी शिवसेना पक्षाच्या (उबाठा) सदस्या सुप्रिया कोळी यांची बिनविरोध निवड दिनांक १८ जुलै रोजी झाली.यावेळी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे, माजी सरपंच मंगेश थळी, माजी उपसरपंच सोनाली ठाकूर, व्यंकटेश म्हात्रे, श्रीमती कल्पना पाटील, सदस्या मानसी पुरो,उज्वला म्हात्रे,पुष्पा म्हात्रे,प्रमिला म्हात्रे,जागृती कोळी , ग्रामपंचायत अधिकारी सुधीर […]
गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला कोकणातून पनवेल शहर पोलिसांनी अटक
पनवेल दि.१७(संजय कदम): गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी कोकणातून अटक केली आहे. प्रशांत पाटील या इसमाला आरोपी असदुल्ला उस्मान मिरकर (वय २८ रा. माणगाव), जुबेर मुजावर (वय २५ रा दापोली) यांनी पनवेल बस डेपोच्या बाहेरील रस्त्यामध्ये या इसमाला गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून त्याला नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग पळस्पे येथे […]
पनवेल महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मानण्यात आले आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार
पनवेल दि.१८ 4k समाचार (संजय कदम ) पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशाने व त्यांच्या अधिकारांतर्गत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याकरीता “ अभय योजना “ लागु करण्यात आली , यामधुन आता जरी पनवेल मधील नागरीकांकरीता शास्तीमधील दिलासा मिळाला असला तरी शिवसेना पक्षाच्या वतीने संपुर्ण करमाफी करीता पुढील काळात हा लढा चालुच राहील, असे असले […]
घरकाम करणाऱ्या नोकराने ४२ लाख ६० हजार किमतीचे दागिने पळविले; खारघर पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक
पनवेल दि.१७ 4k News (संजय कदम): खारघर येथील घरकाम करणाऱ्या नोकराने घरातुन रू. ४२,६०,०००/- किमंतीचे सोन्यावे व चांदीचे व डायंमडचे दागिने, रोख रक्कमेसह पळुन गेलेल्या नोकरास खारघर पोलीस ठाण्याचे पथकाने शिताफिने जालौर, राजस्थान येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील १००% मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. खारघर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणारा […]
पनवेलकरांसाठी खुशखबर! शास्तीमाफीसाठी अभय योजना
(4k समाचार )संजय कदम -पनवेल मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी खुशखबर मिळाली आहे. मालमत्ताकरावरील शास्तीमाफीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. चार टप्प्यात ही योजना असून टप्प्यानिहाय २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्ती (दंड) माफी मिळणार आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अभय योजनेचा नागरिकांना मोठा लाभ होणार […]
