पनवेल, दि.25 (4kNews) ः पनवेल नवी मुंबई चे प्रसिद्ध उद्योगपती महाराष्ट्रीयन बिल्डरचे सरचिटणीस तुकाराम दुधे यांनी आपल्या माता पित्याच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी घरी पूजा अर्चना करून नेरा येथील स्नेहकुंज आधारगृह मधील वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला दुधे परिवारातील तुकाराम दुधे त्यांची बहीण मेव्हणे पत्नी सुरेखा दुधे […]
पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे बेकायदेशीररित्या नारळपाणीसह फळ विक्री करणार्यांना अभय
पनवेल, दि.25 (4kNews) ः परराज्यातून आलेल्या व पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर, कळंबोली आदी विभागात बेकायदेशीररित्या नारळ पाणी तसेच फळ विक्री करणार्या परप्रांतीयांवर पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभाग का कारवाई करत नाही, असा सवाल येथील स्थानिक रहिवाशी करीत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात, तालुका पोलीस स्टेशन समोर, तहसील कार्यालयाजवळ शहरातील विविध रुग्णालये, नारायण […]
कळंबोली येथे सांताक्लॉज द्वारेवाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले
आज रोजी कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने 10.30कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी सांताक्लॉज ला पाचारण करण्यात आले त्याद्वारे वाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. सदर वेळी असंख्य वाहन चालक हजर होते
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ‘रामबाग’ उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
पनवेल (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते. आणि त्यातच पारंपरिक […]
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा; बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी; मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष असून त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी २५ डिसेंबर रोजी, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची […]
करंजाडे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार ः खा.श्रीरंग बारणे
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः करंजाड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आज प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांच्या भेटीमध्ये खा.श्रीरंग बारणे यांनी दिले. प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने करंजाडे मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करत असून यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथे भेट […]
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था दिव्यांग दिन सोहळा संपन्न
पनवेल, दि.23 (4kNews) ः दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातील पनवेल महानगरपालिका, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिव्यांग दिन सोहळा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, नायब तहसीलदार विनोद लचके, संघटना सचिव राजाराम गोरे, सल्लागार वाशीकर, मनसेचे प्रवक्ते योगेश […]
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसर्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने 25 जुलै पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता
पनवेल, दि.23 (4kNews) ः बडोदा मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसर्या बोगद्याचे खोदकाम आरपार झाल्याची माहिती मिळत असून सध्या या मार्गावर युद्धपातळीवर रस्त्याचे बांधकाम सुरु असून जुलै 2025 पर्यंत हे काम पुर्ण करण्याच्या […]
ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस 72 तासाचे आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने गुजरात येथुन केले जेरबंद
नौपाडा पोलीस ठाणे हद्दित दिनांक 17/12/2024 रोजी 01ः50 वा. ते 04ः30 वा. दरम्यान मे. वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा.ली नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इसमांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दाराचे कडी कोयंडा तोडुन तसेच शटर उचकटु, वाकवुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून 28,77,490/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणुन नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 1182/2024 भा.न्या.सं.कलम 331(2), […]
खारघरमध्य दारूच्या नशेत अज्ञात तरुण चढला हाय-टेंशन टॉवरवर
पनवेल, दि.24 (4kNews) ः प्रसिद्ध शोले चित्रपटात जसा धर्मेंद्र म्हणजेच वीरू बसंतीसाठी दारूच्या नशेत उंच पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच काहीसा प्रसंग खारघर येथे घडला असून सदर तरुण दारुच्या नशेत महावितरणाच्या हाय-टेंन्शन टॉवरवर चढला. खारघर येथील सेक्टर 3 मध्ये अज्ञात तरुणाने हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा केला. सदर तरुण दारूच्या नशेत होता. […]
