नवीन बातम्या
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा
गोळेगाव येथे साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
कळंबोलीत पाण्यासाठी हाहाकार! ‘एअर’मुळे जलवाहिनी ठप्प; आठ दिवसांत नवी जलवाहिनी सुरू करण्याचे आश्वासन
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

Tag: #vidhansabhanivdnuk2024

खारघर जवळील घोलवाडी येथे सॅनिटरी पॅड वितरण

पनवेल, दि.22 4kNews ः मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी पार्थ पवार फाउंडेशनने झिरो फाउंडेशनच्या सहकार्याने खारघरच्या घोलवाडी गावात 19 डिसेंबर रोजी सॅनिटरी पॅड वितरण अभियान आयोजित केले होते.या कार्यक्रमाला पार्थ पवार फाउंडेशनच्या व्यवस्थापिका सौ. रुची कौर बनुशाली, झिरो फाउंडेशनचे संस्थापक मुस्सदिफ सिराज मोडक, माजी नगरसेविका सौ. मंजुळा कटकराई, समाजसेवक नितेश पाटील यांची […]

रामकृष्ण अ‍ॅकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक खेळ महोत्सव उत्साहात संपन्न

पनवेल, दि.22 (4kNews) ः पनवेल तालुक्यातील केवाळे येथील रामकृष्ण अ‍ॅकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक खेळ महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अ‍ॅकॅडमीत नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळ प्राविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये प्रामुख्याने धावणे, रिले, कबड्डी, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, रस्सी खेच अशा विविध प्रकारच्या वैयक्तीक व सांघिक खेळाचे […]

नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत

मंत्री पदाच्या दीर्घ प्रतिक्षेत असणारे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडताच रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख परेशभाई पाटील व महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सत्कार व स्वागत सोहळ्यात पनवेल मधील कळंबोली सर्कल येथून बाईक व गाड्यांच्या […]

नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका – आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी

पनवेल (प्रतिनिधी) तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगाने नैना प्रकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून गेमचेंजर होऊ शकतो मात्र त्यासाठी सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलावे,  त्याचबरोबर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटिसा तात्काळ थांबवाव्यात तसेच शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई होऊ नये, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात […]

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांच्या रूपाने ‘नवा अनधिकृत व्यापार जिहाद’ पुकारण्यात आला आहे, या अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात सदरचा विषय मांडताना अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांमुळे नागरिकांना होणारा […]

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नीलेश सोनावणे यांची सलग सातव्यांदा

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी २०२५ च्या.अध्यक्षपदी सर्वानुमते पनवेल युवा चे संपादक जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांची सलग सातव्यांदा निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी राम बोरीले ,उपाध्यक्ष पदी गणपत वारगडा, तर सचिवपदी शंकर वायदंडे, खजिनदार पदि राजेंद्र कांबळे  यांची सर्वानुमते  निवड करण्यात आली. गेली सहा […]

‘रामबाग’ उद्यानाचा रविवारी वर्धापनदिन सोहळा

पनवेल(प्रतिनिधी) दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ च्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे असलेल्या ‘रामबाग’ या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी श्री. सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधासभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, विधान परिषदेचे आमदार […]

सीकेटी (स्वायत्त) महाविद्यलयात आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल 4kNews जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  चांगु काना ठाकूर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज खांदा कॉलनी नवीन पनवेल (स्वायत्त) येथे महाविद्यालयाच्या कर्मचारी अकादमी आणि कल्याण समिती व माधवबाग आणि प्रजापती ग्रुप फौंडेशन यांच्या समन्वयाने आज (दि. २१) महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खांदा वसाहतमधील शिवसेना शहर शाखेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

पनवेल, दि.20 (4kNews) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खांदा वसाहतमधील शिवसेना शहर शाखेचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी साजरा केला. शिवसेना खांदा वसाहत सोहळ्याला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर […]

केव्हीके कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींने राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पटकाविले सुवर्ण पदक

पनवेल, दि.20 (4kNews) ः पनवेल ची मुलगी, केव्हीके कन्याची विद्यार्थ्यांनी दुर्पता साउद (छोटी) हीने नुकत्याच अकोला येथे झालेल्या शालेय राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 44 किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले व आता राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप ला महाराष्ट्र च प्रतिनिधित्व करणार आहे. दुर्पता पनवेल मध्ये एमपीएसए बॉक्सिंग क्लबला सराव, कोच अद्वैत शेंबवणेकर व उमेश रजक […]

Back To Top