4k समाचार पनवेल, दि. १६ सप्टेंबर – पनवेल महापालिका क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब डांबरीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून वाहनधारक आणि रहिवाशांकडून पालिकेकडे तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी ठेकेदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत सज्जड दम दिला […]
हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा; उल गुलाल आंदोलनाची सुरुवात
4k समाचार दि. 15 नवी मुंबई – हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर येथून उल गुलाल आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो आदिवासी बांधव त्यात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची पुढील टप्पा मंत्रालयापर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्ष लकीव […]
तोतया पोलिसाने ८२ वर्षीय वृद्धाला लुबाडले
4k समाचार नवी मुंबई, दि. 15 – सीबीडी परिसरात एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने ८२ वर्षीय परशुराम नारायण परब यांची फसवणूक करून सोन्याची चैन चोरल्याची घटना घडली. सरोवर विहार परिसरातून जात असताना आरोपीने स्वतःला पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. खून झाल्याचा बनाव करून परब यांना त्यांच्या सोन्याची चैन पिशवीत ठेवण्यास सांगून हातचलाखीने ती चोरून नेली. फसवणूक […]
तडीपार गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह घेतले ताब्यात
4k समाचार पनवेल, दि.15 (संजय कदम) ः सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील अजिवली येथे राहणारे कृष्णा चव्हाण यांच्या ट्रान्सपोर्टची महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र.एमएच-46-सीयु-7123 ही 10 लाख रुपये किंमतीची गाडी चोरीस गेल्याप्रकरणी […]
कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश
4 समाचार पनवेल ता.15 ( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य […]
लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर; मुंबई विद्यापीठाकडून सन्मान
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी […]
एमकेसीएल प्रादेशिक बैठकीत नव्या संकल्पांचा उच्चार
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आयोजित प्रादेशिक बैठक पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे २०० केंद्रांचे एएलसी समन्वयक सहभागी झाले होते. विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण, अनुभवांची देवाणघेवाण तसेच आगामी योजनांवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. भविष्यात पनवेल परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रसार वेगाने […]
सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख; गावांची नावे पूर्ववत
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून […]
प्रतिष्ठित सवाई गंधर्व महोत्सवात रायगड नवी मुंबईला मानाचे पान
जागतिक कीर्तीच्या कलाकारांच्या सोबत पं. उमेश चौधरी एकाच व्यासपीठावर
4k सामाचार दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) पं. सवाई गंधर्व यांच्या ७३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कुंदगोळ येथिल ‘संगीत महोत्सवा’त रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांना शास्त्रीय गायनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात पद्मश्री एम. वेंकटेश कुमार, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, विद्वान द्वारकिश एम., पं. गणपती […]
खरेदीच्या बहाण्याने लाखोंची चोरी
4k समाचार दि. 11 नवी मुंबई, खांदेश्वर (प्रतिनिधी): खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात इसमाने संध्याकाळी दुकानात घुसून लाखोंची चोरी केल्याची घटना खांदेश्वर, सेक्टर १६ येथे घडली. महेश स्पोर्ट्स अँड सर्विसेस या दुकानात सुमारे सव्वा सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दुकान मालक महेश धोत्रे यांना खरेदीच्या नावाखाली बोलत असताना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे […]
