नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम



4kNews दि. 16
पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त अर्थात अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण वर्षभर समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्याचा मोठा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाला अनुसरून रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथील विद्यार्थ्यांनी समाजसेवेची सुंदर परंपरा जोपासत माऊली वेलफेअर वृद्धाश्रम नेरुळ व आदिवासी आश्रम शाळा चिरनेर येथे भेट देऊन एक आदर्श सामाजिक उपक्रम पार पाडला.

विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना धान्य, किराणा साहित्य, भाजीपाला, घरगुती आवश्यक वस्तू, स्वच्छता साहित्य, मेडिकल फर्स्ट-एड किट, औषधे, तसेच वस्त्र, उबदार शाल, मोजे, टॉवेल यांसारख्या वस्तूंचे मनापासून संकलन करून वितरण केले. बहुतेक साहित्य हे विद्यार्थ्यांनी स्वतः घरातून, बचतीतून किंवा स्वतःहून गोळा करून दिल्यामुळे या उपक्रमाला एक विशेष भावनिक स्पर्श मिळाला.वृद्धाश्रमात पोहोचताच विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांनी प्रेमाने स्वागत केले. मुलांनी ज्येष्ठांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यांच्यासोबत काही काळ घालवल्याने वृद्धाश्रमात आनंद, उत्साह आणि आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले. अनेक ज्येष्ठ रहिवाशांनी भावूक होत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. 


 या उपक्रमाबद्दल बोलताना मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांनी  सांगितले की, “लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्याला वाहिले आहे. त्यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची शिकवण घ्यावी, हा आमचा उद्देश आहे. आजच्या उपक्रमामुळे मुलांमध्ये करुणा, संवेदनशीलता आणि सेवा यांची खरी भावना निर्माण होण्यास मदत झाली.या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यवस्थापन समिती यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांना व आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचा मोठा आधार मिळाला. तसेच विद्यार्थ्यांची समाजाबद्दलची दृष्टी आणखी व्यापक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top