नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

सिडको प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात  निलेश पाटलांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

4kNews कामोठे
पनवेल, दि. 8 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सिडको’  प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार फोफावला असून, प्रकल्पग्रस्तांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा गंभीर आरोप पनवेलचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून सिडकोतील भ्रष्टाचाराला आळा घालण्याची विनंती केली आहे. 


नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सिडको क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे पनवेल आणि उरणचे आमदार यांनी सिडको अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. सत्ताधारी आमदारांनीच प्रशासनाविरोधात आवाज उठवल्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत आला आहे. सिडकोमध्ये साडेबावीस टक्के विभागात काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले होते. मागील 6 महिन्यांत एसीबीच्या कारवाईत 5 सिडको कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले आहेत, तरीही येथील भ्रष्टाचाराला लगाम लागलेला नाही. 

निलेश पाटील यांनी पत्रातून तीव्र संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, लाच घेताना रंगेहाथ पकडलेले अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होतात आणि सिडकोसारख्या मलाईदार समजल्या जाणाऱ्या विभागात पुन्हा खुर्ची मिळवतात. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता, प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा. नावडे परिसरातील शेतकऱ्यांनी नुकतेच सिडको भवनमध्ये येऊन आंदोलन केले होते. साडेबारा टक्के भूखंड वाटप सोडत होऊन दोन महिने उलटून गेले, तरी इरादापत्र  दिले जात नाही. शेतकऱ्यांकडून विशिष्ट टक्केवारी (कमिशन) घेतल्याशिवाय कोणतीही कामे केली जात नाहीत, असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी पीएमओ कार्यालय (), मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास सचिव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक () तसेच स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रांत पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यावर काय पाऊल उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top