नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

4kNews कामोठे
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सिडकोच्या जमिनीवर विनापरवाना महापालिकेकडून मांडण्यात आलेले शौचालय तोडल्यामुळे जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या गटनेत्या लिना गरड, महानगरप्रमुख ॲड.समाधान काशिद, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नगरसेविका प्रगती कैलास पाटील, उत्तम मोर्बेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गटनेत्या लिना गरड यांनी सांगितले की, खारघर उत्सव चौक येथील अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शौचालय हे सिडकोने पाडल्यामुळे जनतेचे वाया गेलेले दोन कोटी 34 लाख कोणाच्या पगारांमधून कट करणार  सत्ताधारी आणि प्रशासनाचा किती अंदाधुंद कारभार चालू आहे हे प्रकरण  उजेडात आलेले आहेत. खारघर उत्सव चौक आणि इतर ठिकाणी महापालिका प्रशासनाने शौचालय बांधण्याबाबतचे प्रस्ताव बनवून अधिकृतपणे मीटिंग घेतल्या आणि पालिका प्रशासनाने दोन कोटी 34 एवढ्या खर्चाच्या उत्सव चौक येथील शौचालय बांधणी प्रस्ताव मंजुरी वर शिक्कामोर्तत केले. तसेच इतर ठिकाणीही करोडो रुपयांचे विनापरवाना शौचालय बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली. 

टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टरला काम सुद्धा दिले गेले. आश्चर्य म्हणजे उत्सव चौक शेजारील जागा सिडकोची होती , तसेच खारघर मध्ये अजूनही सिडको महामंडळच नियोजन प्राधिकरण आहे, हे प्रशासनाला 100% ज्ञात आहे. महानगरपालिका किंवा कंत्राटदाराला सिडकोची परवानगी घ्यावी, असे वाटले नाही.  बिनधास्तपणे गुंड लोक जसे जागा पकडून, अतिक्रमण करून, अनाधिकृतपणे बांधकाम बांधतात, त्याच पद्धतीने महानगरपालिकेने आरसीसी बांधकाम पूर्ण केले. सिडकोच्या जमिनीवर सिडकोची कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे, दिनांक 3 जून रोजी सदरचे बांधकाम सिडको अतिक्रमण विभागाने जमीन दोस्त केले. यामुळे जनतेच्या करोडो रुपयाच्या निधीचे नुकसान झाले.  

या अतिक्रमण करून अनधिकृत पणे बांधण्यात आलेले शौचालय तोडल्यामुळे जनतेचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. हे नुकसान होण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावावर सह्या केलेले आहेत, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर बरोबर संगणमत केलेले आहे, त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यावर सिडकोच्या जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल एम आर टी पी कायदे अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नुकसान झालेल्या करोडो रुपयाची वसुली संबंधित जबाबदार अधिकाऱ्याच्या पगारांमधून कट करून भरपाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top