नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

ओरायन मॉलच्या यशस्वी १० व वर्धापन दीना निमित्त आयोजित “लाभले आम्हास भाग्य” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे दि. 8
पनवेल दि.०६ रोजी (वार्ताहर): पनवेल येथील ओरायन मॉलच्या यशस्वी १० वर्षांच्या प्रवासानिमित्त आनंद सोहळा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. गेल्या दशकभराचा हा प्रवास आव्हानात्मक आणि बरेच काही शिकवणारा ठरला असला, तरी ग्राहकांच्या, नागरिकांच्या आणि सुहृदांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मॉलने ही यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याची भावना व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली.


   या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्याला भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाबाळासाहेब पाटील,  सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून ओरायन मॉल परिवाराला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या बरवा मनोरंजन मंडळी प्रस्तुत “लाभले आम्हास भाग्य” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. 

या सादरीकरणात सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे आणि संगीतकार अजित परब या महाराष्ट्राच्या लाडक्या कलाकारांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने रंगत आणली. या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंझारराव, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीप करेलिया, मनन परुळेकर यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top