नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

स्वातंत्र्य दिन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

4kNews कामोठे दि. 18

पनवेल (प्रतिनिधी)  देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन आणि पनवेल नगरीचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे अंतर्गत चिंचवली, रिटघर, दूंदरेपाडा, दूंदरे आणि शिवणसई येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माजी सरसपणच रमेश पाटील आणि गुरुनाथ उसाटकर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या वर्षा केवारे, माजी जिल्हा परिषद सदस्य व अनुसूचित जिल्हाध्यक्ष अमित जाधव, तसेच दूंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनुसया वाघमारे, सदस्य शांताराम चौधरी,  प्रलय भोपी, ललिता चौधरी, राणी सिनारे, विश्वास पाटील, माजी उपसरपंच नारायण चौधरी, चिंचवली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास भगत, माजी अध्यक्ष भालचंद्र भोपी, तुकाराम म्हस्कर, विठ्ठल शेळके, सुधीर पालांडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शालेय साहित्य वितरित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहपूर्ण वातावरणात आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आयोजक रमेश पाटील आणि गुरुनाथ उसाटकर यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणारे असे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top