नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन.


4k समाचार

उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी उरण शहरातील मधील गणपती मंदिराशेजारी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. 

यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. या माध्यमातून उमेदवारीला सर्वांगीण पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.उद्घाटन समारंभ प्रसंगी भावनाताई घाणेकर,माजी आमदार मनोहर शेठ भोईर शिवसेना (उबाठा) यांनी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उरण शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. त्यांनी शहर विकासाचा आपला व्हिजन उपस्थितांसमोर मांडला.सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.हे मध्यवर्ती कार्यालय आता निवडणुकीचे रणशिंग फुंकून प्रचाराची धुरा सांभाळणार आहे.  


यावेळी काँग्रेस नेते मिलिंद पाडगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आनंद भिंगार्डे,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस रेहमान सय्यद, पनवेल युवक जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल,माजी नगरसेवक जैद मुल्ला, शेकाप तालुका चिटणीस रवि घरत,युवक रायगड जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील तांडेल, तालुकाध्यक्ष प्रदीप तांडेल, विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे (नाना), युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, उरण शहराध्यक्ष मंगेश कांबळे, तालुका पदाधिकारी प्रकाश म्हात्रे,जिल्हा सरचिटणीस संतोष म्हात्रे, 

जिल्हा सरचिटणीस चेतन म्हात्रे , अल्पसंख्याक विभाग प्रमुख बाबा मुकरी,शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, काँग्रेस उरण शहराध्यक्ष गुफरान तुंगेकर,शिवसेनेचे महेश वर्तक,काँग्रेसचे पदाधिकारी – माजी नगरसेवक बबन कांबळे, उरण शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, उरण शहर अध्यक्ष अफशा मुकरी, शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेविका नाहिदा ठाकूर, आई मांगीरदेवी मच्छिमार सोसायटी चेअरमन वैभव कडू, महिला तालुका अध्यक्ष हेमांगी पाटिल,प्रार्थना म्हात्रे यांच्यासह शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधून  विजयासाठी एकजुटीने प्रयत्न केले जातील, असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top