नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सीकेटी महाविद्यालयात ‘क्रीडा व्यवस्थापन’ विषयावर विशेष चर्चासत्र!



4k समाचार दि. 25    पनवेल:
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयात प्लेसमेंट सेल विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (IISM), मुंबई यांच्या विशेष सहकार्याने बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा व्यवस्थापनातील संधी’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र आयोजित केले होते. 



या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून IISM, मुंबई येथून श्री. आशिष कुमार पाधी (Outreach Associate) हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापन आणि स्पोर्ट्स सायन्स क्षेत्रात करिअरच्या अनेक संधींची माहिती दिली.
यावेळी, स्पोर्ट्स  मार्केटिंग , इव्हेंट मॅनेजमेंट आणि ऍथलीट मॅनेजमेंट यांसारख्या विविध उप-क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक अभ्यासक्रम, कौशल्ये आणि भविष्यातील संधी यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘फक्त खेळणे नव्हे, तर खेळाचे व्यवस्थापन करणे किती फायदेशीर ठरू शकते,’ याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.



या चर्चासत्राचे आयोजन सीकेटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे एकूण १५०  विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील आणि प्रो. (डॉ.) बी. डी. अघाव (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, समन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.
प्रो. सत्यजित कांबळे (अध्यक्ष, प्लेसमेंट सेल), (डॉ.) व्ही. बी. नाईक (शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक), श्रीमती. आरती कागवाडे (प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी), श्रीमती. श्रुती कोळी (प्लेसमेंट समन्वयक) आणि प्लेसमेंट सेल समिती सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या विशेष चर्चासत्राला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे त्यांची या क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top