पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः कारचा दरवाजा अचानक उघडल्याने त्याला मोटरसायकलची धडक बसून दुचाकीस्वार काशिनाथ माने (वय 57) जखमी झाले. या अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काशिनाथ सुदाम माने हेरंब सोसायटी येथून हिरो ग्लॅमर मोटरसायकल (एमएच 06 एडी 4837) वरून पनवेल मार्केटला जात होते. या वेळी पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार […]
दगडाने मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः नवीन पनवेल भावाला मारहाण केल्याची विचारणा केली असता चौघांनी मोबाइल, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मनीष तिवारी, तुषार तिवारी, आरती तिवारी, जगदीश तिवारी यांच्या विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साईनाथ शिंदे याचा सेंट जोसेफ शाळा, सेक्टर चार, कळंबोली येथे वाद झाला. या वेळी साक्षी आणि श्रावणी या तेथे […]
साडेबारा लाखांची फसवणूक
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः रूमचा ताबा न देता दिलेले साडेबारा लाख रुपये परत न केल्याप्रकरणी शंकर गडाला (रा. सेक्टर 6, खारघर), आदी बालामुर्गन (तळोजा फेज टू) यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दीपशिखा प्रवीण जोशी या खारघर, सेक्टर 19 येथे राहत असून, त्या रूम शोधत होत्या. या वेळी शंकर गडाला या […]
नवी मुंबई, पनवेल, उरण शहरात पुढील १५ दिवस ड्रोन उडविण्यास बंदी
Anchor-भारत-पाकिस्तान या दोन देशात अजूनही तणाव परिस्थिती असल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टी नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे .नवी मुंबई आणि पनवेल , उरण शहरात पुढील दोन दिवस ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन उडवल्यास त्याच्यावर नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उरण शहरात जेएनपीटी बंदर , ओएनजीसी , वायू आणि तेलसाठा मोठा असल्याने […]
खांदा कॉलनीत शनिवारी परिवर्तनच्या वतीने बुद्धभीम जयंती महोत्सवाचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी); तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त खांदा कॉलनी येथे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने बुद्धभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता जाहीर व्याख्यान व प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक […]
रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून जवळपास साडे एकोणीस लाख रुपये लुबाडणारा सराईत भामटा अटकेत
पनवेल, दि.16 (संजय कदम) ः रेल्वे मध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोेकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यापूर्वी सुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. पनवेल शहरात […]
तरुणी बेपत्ता
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः राहत्या घरातून एक तरुणी कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. निकिता रामदास कातकरी (21 रा.पळस्पे गाव) असे या तरुणीचे नाव असून बांधा मजबूत, चेहरा गोल, डोळे काळे, नाक बसके, उंची 4 फुट असून अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढर्या […]
शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल महानगरपालिका सह संपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी तळोजा भोईरपाडा येथील राहत्या घरी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाळाराम मुंबईकर यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. 1967 पासून शिवसेनेत सक्रिय असून, पक्ष स्थापनेपासून […]
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑल आऊट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआऊट केल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 चे प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागचे अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल व अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे […]
शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिवसेना उपनेते व कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था तळोजाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळांचा निकाल 100% लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल (सीबीएसई बोर्ड ), द इलाईट पब्लिक स्कूल ( स्टेट बोर्ड), कै.कमळ पाटील माध्यमिक विद्यालय, अनुसया बबनदादा पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांचा […]
