4k समाचार दि. 19पनवेल (प्रतिनिधी) हृदयातील भावना म्हणजे साहित्य,कवी-साहित्यिक लिहितात ते खऱ्या अर्थाने हृदयाला भिडत. आयुष्याच्या धकाधकीत मनाला समाधान वाटत असेल तर साहित्यिक कार्यक्रमाला जावे,कवी संमेलनातील शब्दांची मैफिल ही मनाला नवीन ऊर्जा देते असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे काढले.श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल […]
सीकेटीच्या अवधूत नाईकची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड सीकेटी विद्यालयाचा अभिमान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन
4k समाचार दि. 19 पनवेल (प्रतिनिधी) क्रीडा व युवक संचालनालय पुणे व महाराष्ट्र राज्य आणि मुंबई उपनगर क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमेया क्लासिक क्लब यशवंत नगर विरार येथे झालेल्या मुंबई विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक (सी के टी) विद्यालयातील इयत्ता बारावीतील अवधूत सागर […]
आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात ४२२ स्पर्धकांचा सहभाग सीकेटी महाविद्यालयात १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा
4 समाचार दि 19 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण सुरुवात झाली. २२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील तब्बल ४२२ स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी […]
पनवेलचे प्रेम पोटे व सोनिया दलाल यांचा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न
4k समाचार पनवेल दि. 19 — पनवेलमधील सुप्रसिद्ध पोटे मसाले कुटुंबातील निलेश पोटे यांचे सुपुत्र प्रेम पोटे यांचा विवाह सोहळा नुकताच सोनिया सर्वेश दलाल हिच्याशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शुभविवाह प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, निलेश पाटील, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, संजय जैन, पत्रकार संजय कदम, राकेश पोटे आदी मान्यवरांनी उपस्थित […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यतीन देशमुख प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक
4k समाचार पनवेल दि.19 (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून ते निवडणुकीला उभे राहिल्यास महायुतीच्या प्रस्थापित नगरसेवकांना प्रभाग १६ मधून तगडे आवाहन उभे राहणार आहे. यतीन देशमुख हे पनवेल महापालिकेच्या २०१७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुद्दा उभे होते. मात्र त्यांचा […]
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील
4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )राजकारणाच्या दृष्टीकोणातून उरण तालुका अत्यंत महत्वाचा समजला जातो अशा या महत्वाच्या उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी उरण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे आणि कार्याध्यक्ष अशोकराव भोपतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत रानसई येथे झालेल्या उरण पनवेल […]
शिव मावळे करंजाडे यांच्या माध्यमातून किल्ले रायगड वर स्वच्छता मोहीम.
4k समाचार उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर्ती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ह्या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येने उपस्थित […]
आपली शेती म्हणजे सोन्याची खान. शेती जमिनी विकू नका.
4k समाचार उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )आज रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाच्या विविध प्रकल्प साठी दिल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मूलभूत सेवा सुविधा पासून वंचित राहिला आहे ही बाब लक्षात घेऊन वशेणी येथील सामाजिक कार्यकर्ते लवेश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांनो, भूमीपुत्रांनो आपल्या पिकत्या जमिनी विकू नका. देशोधडीला लागू […]
पक्षी सप्ताह निमित्त चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांच्या कुंचल्यातून साकारले गेले ‘पक्षाचे जग’.
4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )जेष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून ‘पक्षी सप्ताह’ साजरा केला जातो. दिनांक ०५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या सप्ताहात वनखाते, निसर्गप्रेमी, पक्षी मित्र हे जंगल भटकंती, पक्षी निरीक्षण व नोंदी आणि पक्षी संवर्धनाचे विविध कार्यक्रम करत असतात. या […]
उरण शहरात ना.आशिष शेलारांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पदासह २२ उमेदवारांचे अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनात दाखल.
4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी – शाह यांच्या समावेत भाजपाचे सर्वच्या सर्व २१ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा रायगड जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार,पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक […]
