नवीन बातम्या
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
*ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली.
*दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया हनुमान करमेलकर यांची बिनविरोध निवड*
सिडकोचा कारभार मोगलाई पद्धतीचा परंतु देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही ः आ.विक्रांत पाटील
युनिव्हर्सल ग्रुप पनवेल यांच्या वतीने अनोखा दुहेरी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थांचा सत्कार आणि ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ एक प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन
‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ नाटक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे युनिव्हर्सल ग्रुपच्या तर्फे पनवेल मध्ये आयोजन

कळंबोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडी प्रकरणाचा छडा लावून १३.७० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

4kNews कामोठे
पनवेल, दि.12  (वार्ताहर) ः   कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात कळंबोली पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोथे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली त्या वेळी गुन्हे प्रकटीकरण प्रमुख PSI अमोल चौगुले सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड, निलेश सोळुंखे,शरद मराठे यांची कौशल्य पूर्ण तपास करून आरोपीस पकडण्यात आले 


आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी तब्बल १३ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण तपास पथकाचा नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. मिलिंद भारंबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपींनी भरदिवसा घरफोडी करून सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, ९३ ग्रॅम चांदीचे दागिने व वस्तू तसेच १२ हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कळंबोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास ७० ते ८० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तसेच आधुनिक तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून गुन्ह्याशी संबंधित गुगल आयडी तसेच एकूण दहा मोबाईल क्रमांकांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश आले.


तपासादरम्यान आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातील आंबेडकर नगर जिल्ह्यात आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास पथकाने तेथे जाऊन सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच एक आरोपी शेताच्या दिशेने पळून गेला. मात्र पोलिसांनी जवळपास ५०० मीटरपर्यंत पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीच्या मालापैकी सुमारे १३ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अत्यंत बारकाईने केलेला तपास, आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर, राज्याबाहेर जाऊन केलेली धाडसी कारवाई आणि चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात मिळालेले यश यामुळे ही कारवाई विशेष उल्लेखनीय ठरली आहे.


या उत्कृष्ट तपासकार्याची दखल घेत मासिक गुन्हे आढावा बैठकीत नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. मिलिंद भारंबे यांच्या हस्ते संपूर्ण तपास पथकाला प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कळंबोली पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे.Photo : पथकाचा नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. मिलिंद भारंबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top