*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
4kNews कामोठे दि. 10 *पनवेल/प्रतिनिधी:*भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कोळेश्वर विद्यामंदिर (शाळा क्र. ४) येथील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट आणि शिक्षकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित […]
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
4kNews कामोठे दि. 10 पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गमित्र – पनवेल यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, नवख्या पर्यटकांसाठी धोक्याची घंटा. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंती करण्याचा मोह अनेकांना असतो. मात्र, डोंगर-दऱ्यांचा अनुभव नसताना, स्थानिक मार्गदर्शकांची मदत न घेता आणि योग्य नियोजनाशिवाय केलेली भटकंती कधी जीवघेणी ठरू शकते, याची प्रचिती माची प्रबळगड परिसरात आज घडलेल्या घटनेतून आली. माची प्रबळगडावर […]
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
4kNews कामोठे दि. 8पनवेल प्रतिनिधीरोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल परिसरातील सर्व रोटरी क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ (व्यावसायिक उत्कृष्ट पुरस्कार) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड यांचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.भारतीय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी […]
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
4kNews कामोठे di. 8 पनवेल (प्रतिनिधी) रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज (दि. ८) चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल ६४ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने रोजगाराच्या विविध क्षेत्रांतील […]
उरण महाविद्यालयात जपानी भाषा प्रशिक्षणाची सुरुवात.
4kNews कामोठे उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा शिकवली जाणार आहे. जपान मधील करिअरच्या संधी लक्षात घेऊन तसेच भारतातील विविध जपानी कंपन्यांमध्ये कार्य करण्यासाठी जापनीज भाषा येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.उरण सारख्या ठिकाणी अश्या प्रकारची भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वर्गाचा नुकताच उदघाटन कार्यक्रम पार पडला. […]
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
4kNews कामोठे उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्रातील केंद्राच्या ओबीसी यादीत प्रलंबित असलेल्या २७+६ ओबीसी जातींच्या समावेशासह इतर महत्त्वाच्या ओबीसी प्रश्नांसाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनच्या शिष्टमंडळाने २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्री, खासदार, राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर […]
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
4kNews कामोठे उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना कामगारांना त्यांचे न्यायी हक्क मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर असते. या वर्षातील ९ वा करार करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. मे. अमेया CFS (PSA) खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांचा पगारवाढीचा करार […]
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
4kNews कामोठे उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धा – २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या […]
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
4kNews कामोठे दि. 8नवीन पनवेल, प्रतिनिधी :विचुंबे गाव येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री कृष्णा काडवे बुवा शिष्यगण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य बुवा श्री. कृष्णा पांडुरंग काडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्याची सुरुवात विचुंबे गावचे माजी उपसरपंच […]
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
4kNews कामोठे पनवेल, दि.8(वार्ताहर) : टेलिग्रामवरील बनावट ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून अधिक नफ्याचे आमिष दाखवून तब्बल १९ लाख ९० हजार १२५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला अज्ञात आरोपीने प्रथम व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर टेलिग्रामवरील @Mariam_VIP005 या ग्रुपमध्ये जोडत ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा […]
