4 समाचार पनवेल ता.15 ( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य […]
उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.
4k News उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि पनवेल या ९५ गावांच्या जमिनीवर सध्या गब्बर लोकांचा डोळा असताना या परिसरामध्ये एक गुंठा एक प्लॉट अशा जाहिरातींना बळी पडून पर राज्यातील आणि काही बांगलादेशी नागरिकांचे उरण पूर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार सुरू आहेत . परंतु महाराष्ट्र नवनिर्माण […]
लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर; मुंबई विद्यापीठाकडून सन्मान
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी […]
महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार
4k समाचार मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत – • “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी […]
“दिबा मानवंदना कार रॅलीचे आयोजन ”
4k समाचार उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी ते जासई (उरण तालुका )असे नवी मुंबई मार्गे “दिबा मानवंदना कार रॅली” चे आयोजन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील […]
उरण तालुका वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नवनियुक्त पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट…
4k समाचार उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता नांदावी यासाठी रात्रंदिवस आपले कर्तव्य चोखपने बजावणारे पोलीस अधिकारी कर्मचारी या देशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. समाजात जातीय सलोखा,शांतता, समानता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरते. उरण तालुक्यात सर्व जाती धर्माची नागरिक सुखाने, गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.उरण मध्ये अनेक विविध राष्ट्रीय […]
अपघाताचे व वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता केली मागणी.
4k समाचार उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील उरण पनवेल मुख्य रस्त्यावर दास्तान फाटा येथे अपघाताचे तसेच वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.आतापर्यंत त्या ठिकाणी आणि जासई ब्रिजजवळ आणि आसपास १७ अपघात झाले आहेत, त्यापैकी काही किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, काही जणांना मृत्यूला […]
ओबीसीच्या आरक्षणात मराठ्यांची घुसखोरी आगरी कोळी कराडी समाज सहन करणार नाही.
4k समाचार उरण दि.१३ (विठ्ठल ममताबादे)राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहेत. व शासनाच्या GR(शासन निर्णय )प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामूळे ओबीसी प्रवर्गात असलेल्या विविध जाती उपजाती यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश […]
एमकेसीएल प्रादेशिक बैठकीत नव्या संकल्पांचा उच्चार
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आयोजित प्रादेशिक बैठक पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे २०० केंद्रांचे एएलसी समन्वयक सहभागी झाले होते. विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण, अनुभवांची देवाणघेवाण तसेच आगामी योजनांवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. भविष्यात पनवेल परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रसार वेगाने […]
सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख; गावांची नावे पूर्ववत
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून […]
