भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका […]
अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड
पनवेल दि.(१५(वार्ताहर): तळोजा परिसरात अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड करून मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत केला आहे. तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील पाले खुर्द येथील इसम विकास नारायण दुर्गे ( वय 50 वर्षे) हा त्याचे स्वतःचे मालकी जागेत अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करत असल्याची […]
*रिक्षा चालकच ठरला रिक्षा चोर; पनवेल शहर पोलीसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरास अटक करून १८ ऑटो रिक्षा जप्त केल्या*
पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक करून १२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १८ रिक्षा बुलढाणा येथून जप्त करण्यात यश आले आहे. मुख्य मंझे हा रिक्षा चालवत असतानाच चोरीच्या रिक्षा हेरून तो त्या चोरी करत होता. पनवेल शहर परिसरातील व आजुबाजुच्या पोलीस ठाणे परिसरात दिवसेंदिवस रिक्षा चोरीच्या गुन्हयांच्या वाढत्या […]
‘युवा पर्यावरण संसद’चे आयोजन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगर पालिका आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने ‘युवा पर्यावरण संसद’चे आयोजन आज (दि. 13) करण्यात आले होते. खारघर येथे झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन विधानसभा कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सकारात्मक चर्चेला महत्व असल्याचे त्यांनी सांगून समाजाप्रती असलेले […]
अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार – आमदार निरंजन डावखरे
पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास भाजप सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक […]
रविवारी कामोठेत लीग बॉक्स क्रिकेट सामने
पनवेल (प्रतिनिधी) प्रदीप भगत युवा मंच प्रभाग ११ यांच्या विद्यमाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कामोठे येथे सोसायटी प्रीमिअर लीग बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर २२ मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला १० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला ५ […]
देहरंग धरण उंची वाढवण्याच्या नियोजित प्रकल्पाला आर्थिक पाठबळ द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गाढी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेची स्थापना ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली […]
शिवजयंतीनिमित्त उलवे नोडमध्ये “महाराष्ट्राची महासंस्कृती”
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला “महाराष्ट्राची महासंस्कृती” या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल […]
अखेर कु. सृष्टीच्या कुटुंबाना मिळाला न्याय..
उरण /प्रतिनिधी :पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. कु. सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी आश्रमशाळेतील असणाऱ्या शिक्षकांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही तासाने कु. सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना मृत्यूची झुंज देत […]
कोकणचो रुबाब भारी या मालवणी नाटकाने जिंकली रसिकांची मने
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ , पनवेल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात संपन्न झाले. डॉ. भगवान बिरमोळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून […]
