पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : मे महिना म्हणजे चोरट्यांचा सुगीचा काळ. या कालावधीत बहुतेक कुटुंब आपल्या मुळ गावी अथवा बाहेरगावी फिरण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरी हेरून ते पूर्णपणे साफ करतात. या सुट्टीच्या हंगामात चोरट्यांचा सुळसुळाट वाढून चोरी, घरफोडी सारख्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सुट्टीच्या हंगामात बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन […]
उलवे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई
पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच बेकायदेशीर कृत्य आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे […]
*अचानकपणे आलेल्या पावसामुळे पनवेलकर सुखावले*
पनवेल दि.०७(वार्ताहर): गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः कहर केला होता. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले होते. पण आज दुपारी सुमारे बारा वाजता आकाश अचानक गडगडू लागलं, विजा कडाडू लागल्या आणि काही क्षणांतच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला. गेल्या […]
*अवकाळी पावसाचा फटका; काही ठिकणी लागल्या आगीसह वृक्ष पडले उन्मळून*
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल मध्ये अचानकपणे मंगळवारी रात्री तसेच बुधवारी धुपरी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला बसून काही ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार तर काही ठिकाणी मोठं मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. आज करंजाडे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सर्वर बॉक्सला आग लागली होती याची माहिती […]
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण
पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय च प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मी मध्ये भरती झाले. आणि सन २०१३ साली १६ […]
खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः खारघर पोलीस ठाणे मध्ये येणार्या नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि शासकीय सेवांची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने लावण्यात आलेले शासकीय सेवांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असून, सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था राखणारे तसेच गुन्ह्यांचा तपास करुन नागरिकांना मदत करणारे महत्वाचे ठिकाण आहे. दरम्यान, खारघर पोलीस ठाणे […]
बांठिया विद्यालयात ’मेहफिल ए सुखन’ काव्य गजल संमेलन संपन्न
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः नवीन पनवेल येथील के. आ. बांठिया विद्यालय सभागृहात 3 मे रोजी मेहफिल ए सुखन काव्य गजल संमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ’ती माणसं गेली कुठे ?’ या पुस्तकातील कविवर्य खावर यांच्या जीवनावरील लेखाचे अभिवाचन निलीमा काटके यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सादर केले. या कार्यक्रमात ललित कला कोकण साहित्य रत्न पुरस्कार ललित […]
ग्रामीण भागातून जे. एम. म्हात्रेंना वाढता पाठिंबा; भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली
पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. जे. एम. म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जाहीर […]
महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका
पनवेल, (4K News)– “मी आजही शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मात्र महाविकास आघाडीची भूमिका पटत नसल्यामुळे मी त्यातून बाहेर पडत आहे,” असे स्पष्ट वक्तव्य नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले. म्हात्रे यांनी सांगितले की, “गेल्या ४८ वर्षांपासून मी शेकापच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी नेहमी […]
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
पनवेल: राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिरते लोकन्यायालय आणि कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 24 मार्च रोजी नेरे येथे फिरते लोकन्यायालय, तर 25 मार्च रोजी ग्रामपंचायत करंजाडे येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले. या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ पनवेल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून सर्व […]
