नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन




4kNews कामोठे दि. 12
पनवेल (प्रतिनिधी) सर्व समाजाचे प्रेरणास्थान, गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आणि नावलौकिक असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचा उदघाटन सोहळा महाराष्ट्राचे राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ०६.३० वाजता उलवे नोड मधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर मैदानावर भव्य स्वरूपात होणार आहे.   



 या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे, रोजगार हमी फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री भरतशेठ गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा खासदार सुनिल तटकरे, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  



  लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून हजारो युवकांना रोजगार, शिक्षण व सामाजिक आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उभ्या राहिल्या असून समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजकारणाला प्राधान्य देणारे आणि दानशूर वृत्तीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गरीब कुटुंबातून पुढे येत त्यांनी संघर्षाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा समाजसेवा आहे. शिक्षण, सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, आपत्ती मदत या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेक शिक्षण संस्थांना मदत करून ग्रामीण आणि कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे त्यांनी खुली केली.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते सतत गरजू लोकांना मदत करतात. समाजातील वंचित, पीडित आणि गरजू लोकांना आधार देणे हे त्यांचे जीवनव्रत आहे.राजकारणात असूनही त्यांनी नेहमी समाजकारणाला अग्रक्रम दिला. 

साधेपणा, जनसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यामुळे ते महाराष्ट्रातील एक आदर्श लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा अमृतमहोत्सवी वर्ष महत्वाचा आणि प्रेरणादायी आहे. त्याच अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनावर आधारीत आढावा घेणाऱ्या ‘रामपर्व’ या विशेष पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे प्रकाशनही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उलवे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात आलेली रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ही प्रशस्त इमारत, सुसज्ज वर्गखोल्या अत्याधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीमुळे परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली असून या विद्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा यावेळी संपन्न होणार आहे. तरी या विशेष सोहळ्यास पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते व समितीचे कार्याध्यक्ष जे.एम.म्हात्रे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top