नवीन बातम्या
निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी
गव्हाणमधील जीर्ण अंगणवाड्यांसाठी नवीन इमारतींची मागणी; पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळींचे सिडकोला निवेदन 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न; जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती
*”कामोठेकरांच्या आरोग्याशी खेळ? कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन”*
एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या हिरामण सुर्वे यांना शुभेच्छा
पनवेल वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार
पनवेल पालिका हद्दीतील प्रलंबित नागरी प्रश्नाबाबत प्रहार संघटनेची पालिका आयुक्तसोबत बैठक संपन्न !!.

*”कामोठेकरांच्या आरोग्याशी खेळ? कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन”*


4kNews कामोठे दि. 5
कामोठे शहरातील विविध सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गढूळ, पिवळसर व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने आज सिडको पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री.चहारे ह्यांना निवेदन देण्यात आले. 



नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे फोटो व व्हिडिओ समोर आले असून पाण्यामध्ये गाळ व इतर अशुद्ध घटक आढळत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे.
कामोठे कॉलनी फोरमने सिडको प्रशासनाकडे पाणीपुरवठा यंत्रणेची तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली असून विविध सेक्टरमधील सोसायटी मधील पाण्याचे नमुने NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.



तसेच कामोठे शहराला सिडकोकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे टँकर वर लाखो रुपये खर्च होत आहेत, त्यामुळे सिडको कडून पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करण्याची मागणी सुद्धा बैठकी दरम्यान आली.
याबाबत सिडको प्रशासनाने तातडीने खुलासा करून स्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा कामोठेतील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांनी दिला आहे. 



ह्यावेळी कामोठे कॉलनी फोरम महिला अध्यक्षा जयश्री झा, सचिव बापू साळुंखे, अर्पिता वाणी, शीतल पाटील,सुनील आडे , संतोष नायर, मनोहर पवार तसेच शहरातील काही सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top