नवीन बातम्या
निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी
गव्हाणमधील जीर्ण अंगणवाड्यांसाठी नवीन इमारतींची मागणी; पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळींचे सिडकोला निवेदन 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न; जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती
*”कामोठेकरांच्या आरोग्याशी खेळ? कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन”*
एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या हिरामण सुर्वे यांना शुभेच्छा
पनवेल वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार
पनवेल पालिका हद्दीतील प्रलंबित नागरी प्रश्नाबाबत प्रहार संघटनेची पालिका आयुक्तसोबत बैठक संपन्न !!.

एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक

4kNews कामोठे
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः सुमारे 32 कोटी रुपयांच्या एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेला संशयीत आरोपी सहा महिन्यांपासून फरार होता. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने तळोजा येथून अटक केली. अटकेवेळी आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वसी उर्फ छोटू कमर अहमद अन्सारी (वय 27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तळोजा फेज-2 येथील साईधाम सोसायटीत भाड्याने राहत होता. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा, भिवंडी घटक-2 मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार, मागील वर्षी कोनगाव पोलीस ठाण्यात एमडी अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात वसी हा फरार आरोपी होता. या प्रकरणात सुमारे 32 कोटी रुपयांचा एमडी जप्त करण्यात आला होता. तपासादरम्यान अमलीपदार्थाच्या विक्री व वितरणामध्ये त्याची भूमिका असल्याचे निष्पन्न झाले 

होते.फरारीनंतर वसी वारंवार ठिकाणे बदलत असल्याची माहिती तांत्रिक तपासातून समोर आली होती. नेरूळ, तळोजा, डायघर आणि अन्य परिसरात त्याच्या हालचाली सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. सेक्टर-19 येथील साईधाम सोसायटीमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडतीदरम्यान आरोपीकडून सुमारे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 900 रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात वसी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले करीत आहेत. आरोपीने पिस्तूल कुठून आणि कोणाकडून मिळविले याचा तपास सुरू असून न्यायालयाने त्याला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top