नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘



4kNews कामोठे दि. 12
पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. १३) सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृद्य गौरव होणार आहे. 

   संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 


  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेल्या ‌‘रामशेठ नाबाद ७५‌’  या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, तर संस्थेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‌‘अमृतपर्व‌’ या स्मरणिकेचे प्रकाशनसुद्धा त्यांच्या हस्ते होईल. रयत शिक्षण संस्था व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णांनी सुरू केलेला वसा पुढे नेण्याचे काम रयतसेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आहेत. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था असतानाही त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झाले. रयतला मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजात आदर्श घालून दिला आहे. सातारा येथे होणाऱ्या सत्कार सोहळ्यास संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, शाखाप्रमुख सेवक उपस्थित राहणार आहेत. शिक्षणप्रेमींनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top