नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार

4kNews कामोठे

पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेल रश्मी नांदेडकर
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः साईनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार व त्यांच्या सहकार्याने आज साईनगर या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे व या ठिकाणी पोलीस कार्यरत राहणार आहेत असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेलच्या रश्मी नांदेडकर यांनी या पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.


सदर नवीन साईनगर पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेल श्रीमती रश्मी नांदेडकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह स्थानिक नगरसेवक लतिफ शेख व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि साई नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर पोलीस मदत केंद्र हे स्थानिक नगरसेवक लतिफ शेख यांच्या माध्यमातून उभारण्यात आले असून साईनगर हा परिसर नव्याने विस्तार होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या पोलीस चौकीचा मोठा उपयोग होणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top