नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 1 जुलै रोजी

4kNews कामोठे
पनवेल, दि. 30  (वार्ताहर) ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष  युथ रिपब्लिकनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम बुधवार, दि. 1 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम पनवेल येथील गुरुलिंगेश्वर शाळा, पनवेल एम.टी. डेपो परिसर येथे पार पडणार आहे. 


रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रिपब्लिकन चळवळीचे नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष निलेश कांबळे आणि पनवेल शहर अध्यक्ष प्रशांत सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. शिक्षण हा समाजपरिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top