नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

4kNews  कामोठे

पनवेल, दि.30 (संजय कदम) ः पनवेल शहर परिसरात बंद दुकानाची कडी कोयंडे उचकटून आतमध्ये असलेली रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून तो गुजरात येथे पळून जात असताना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसामध्ये पनवेल शहरातील लकी स्पोटर्स्‌‍, सखी कलेक्शन, बिकानेर स्वीटस्‌‍, श्रीकृपा स्टेशनरी, बुक शॉप या ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरी करून दुकानातील फक्त रोख रक्कम चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 

सदर चोरट्याला शोधण्याचे पनवेल शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दत्तात्रेय देवकाते, पो.हवा.संदेश म्हात्रे, मिथुन भोसले, अमोल पाटील, पो.शि.साई मोकळ, काकडे आदींच्या पथकाने सदर गुन्हेगाराचा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेत असताना सराईत गुन्हेगार जगदीश फराड (45, रा.चिंध्रण) याची माहिती मिळाली. त्यानुसार पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने या चोऱ्यांची कबुली दिली असून त्याने यापूर्वी सुद्धा पनवेल शहर परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा फक्त रोख रक्कमच चोरत असे व त्यानंतर तो गुजरात येथे त्याच्या घरी जात असे व काही दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे चोरी करीत असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top