नवीन बातम्या
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा
मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना
१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी
तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू
कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू


4kNews कामोठे
मुंबई, दि. 10 (अजित मोहिते) : भारताची आर्थिक वाढ, वाढता शहरीकरण, डिजिटल परिवर्तन आणि लोकसंख्यात्मक लाभामुळे बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) व गृहनिर्माण वित्त कंपन्यांसमोर (HFC) मोठ्या संधी आहेत. या क्षेत्राचा पुढील टप्प्यातील विकास तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून राहील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) उपराज्यपाल एस. सी. मुर्मू यांनी सांगितले. 



‘NBFCs, HFCs and the New Phase of Growth’ या विषयावर आयोजित ७व्या CII NBFC आणि HFC परिषदेत ते बोलत होते. भारताला विकसित, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मजबूत व वैविध्यपूर्ण कर्जव्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
NBFC क्षेत्र आर्थिक समावेशन, शेवटच्या घटकापर्यंत कर्जपुरवठा, क्षेत्रनिहाय तज्ज्ञता तसेच नाविन्यपूर्ण वित्तीय उत्पादनांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मुर्मू यांनी सांगितले. NBFC कर्जाचे प्रमाण नाममात्र GDPच्या सुमारे १६.७ टक्क्यांवर पोहोचले असून, अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या एकूण कर्जपुरवठ्यात त्यांचा वाटा सुमारे २७ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली.



मात्र, वाढीच्या प्रक्रियेत कर्जमंजुरीचे निकष, मालमत्तेची गुणवत्ता आणि ग्राहक संरक्षणाशी तडजोड होता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला. सुशासन, तरलता व्यवस्थापन, मालमत्ता गुणवत्ता व पतजोखीम, ग्राहक संरक्षण तसेच डिजिटल परिवर्तन आणि सायबर सुरक्षा या पाच बाबींना आगामी काळात विशेष महत्त्व राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाचा वापर करताना संस्थात्मक जबाबदारी कमी होता कामा नये. ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण आणि सायबर सुरक्षा यामुळेच सार्वजनिक विश्वास टिकवता येईल, असेही मुर्मू यांनी सांगितले. RBIचे नियमन हे नवोपक्रम आणि आर्थिक स्थैर्य यांच्यात संतुलन साधणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



CIIच्या राष्ट्रीय NBFC व HFC समितीचे अध्यक्ष अभिमन्यू मुंजाल यांनी जबाबदार आणि व्यापक कर्जवितरणावर भर दिला. तर उपाध्यक्ष उमेश रेवणकर यांनी ‘गुणवत्तेसह विस्तार’ आवश्यक असल्याचे सांगितले. राकेश सिंह यांनी बँका, NBFC, HFC, फिनटेक आणि तंत्रज्ञान संस्थांमधील सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top