नवीन बातम्या
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा
मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना
१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी
तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू
कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात


4kNews कामोठे दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, भक्तिसंगीत आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा सुरेल आविष्कार घडविणारा ‘मेहफिल-ए-अनुराग’ हा ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा भव्य सांस्कृतिक सोहळा खारघर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गायन, कथक नृत्य, तालवाद्यांची साथ आणि भक्तिसंगीताने सजलेल्या या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.



कार्यक्रमात पं. तुषार चॅटर्जी, रंजना चॅटर्जी व सौर्यादीप चॅटर्जी यांनी राग मुलतानी आणि ‘चलो मन गंगा यमुना तीर’ सादर करून मैफलीची सुरेल सुरुवात केली. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांनी राग पुरिया धनश्री, तराणा आणि मराठी अभंग सादर करत शास्त्रीय संगीत व भक्तिपरंपरेचा सुंदर मिलाफ घडविला. 



विदुषी सुरंजना बोस यांनी राग रागेश्री, ठुमरी, कजरी व रागप्रधान रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. मोंद्रिता चॅटर्जी यांनी कृष्ण वंदना व तराण्याच्या माध्यमातून कथक नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाचा समारोप पं. प्रताप पाटील व त्यांच्या संचाने पखावजावर सादर केलेल्या शिव तांडवाने झाला. 



तबला, हार्मोनियम व मंजीरा यांच्या प्रभावी साथसंगतीने संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. सूत्रसंचालन मोहर भट्टाचार्य यांनी केले.
यावेळी ह.भ.प. भजन पंडित निवृत्तीबुवा चौधरी, वसंत शेठ पाटील, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पियुष शहा, सिडको युनियनचे माजी अध्यक्ष जे. टी. पाटील, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष कुंभार यांच्यासह मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ‘संस्कृतीर दिशारी’च्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असून, ‘मेहफिल-ए-अनुराग’ हा त्याच सांस्कृतिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top